मिरारोड : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाने वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या महिला वेश्यादलावर अटक कारवाई करून तिच्या ताब्यात असणाऱ्या ०३ पिडीत मुलींची सुटका केली आहे. अधिक माहिती नुसार
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांना दिनांक दि.३०.०६.२०२२ रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, साक्षी ही महिला मिरा-भाईंदर परिसरातील तिच्या संपर्कात असणाऱ्या पुरुष गि-हाईकांना मुलींचे फोटो पाठवून गि-हाईकांच्या पंसतीनुसार वेश्यागमनाच्या मोबदल्यात मिरा-भाईंदर परिसरातील लॉजवर मुली पुरविते.मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांनी कायदेशीर बाबींची पुर्तता करुन बोगस गि-हाईक व पंच यांना मॅकडोनाल्ड हॉटेल समोरील रोडवर, कनकिया रोड, मिरारोड पूर्व येथे पाठवुन सत्यता पडताळली व पोलीस पथकासह ०५.४० वा. छापा टाकला असता महिला वेश्यादलाल लता उर्फ साक्षी शिंगारे हिने ०३ मुलींना दाखवुन बोगस पुरुष गि-हाईकाकडुन वेश्यागमनाची एकुण रु. ६,६४०/- रक्कम स्विकारली होती त्यानुसार तिला तिथेच पोलिसांनी सापळा रचून रंगेहात रोख रक्कम मुद्देमालासह ताब्यात घेवुन ०३ पिडीत मुलीची सुटका केली. सदर घटनेबाबत सपोनि/उमेश पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने महिला आरोपीविरुध्द मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस उपआयुक्त, (मुख्यालय), अतिरिक्त कार्यभार (गुन्हे), श्री.अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली .श्री देविदास हंडोरे/पो.निरिक्षक अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर, सपोनि/तेजश्री शिंदे भरोसा सेल, सपोउपनि/उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पोशि/केशव शिंदे, मपोहवा/सुप्रिया तिवले व चा.पोहवा/सम्राट गावडे यांनी केली आहे.
