प्रभादेवी : महिला प्रवाशी स्नेहा संजय पाटील. वय – २१ ह्या घाईघाईने लोकल मध्ये चढत असताना त्यांचा मोबाईल फोन खाली पडला फलाटावर पाहीले असता तेथे नसल्याचे त्यांस दिसून आले तसेच त्यावर संपर्क साधला असता तो रिंगिंग होत असल्याचे कळले याबद्दल त्यानीं प्रभादेवी रेल्वे स्थानक येथे तक्रार दाखल केली त्यानुसार पोलीस अंमलदारयांनी त्याअनुषंगाने सदर मोबाईल फोनचा शोध घेत असताना प्रवासी महिला यांच्या क्रमांकाशी संपर्क झाला. तो डी. जी. पाटील, सिनियर सेक्शन इंजिनियर, इ. एम. यु. कारशेड, मुंबई सेंट्रल यांनी उचलुन सदर मोबाईल फोन हा कारशेड मध्ये वॉशिंग करणारे कर्मचारी यांना भेटला असल्याची माहीती मिळाल्यावर त्याठिकाणी जावून सदर मोबाईल ताब्यात घेवुन तो फोन सदर महिलेच्या ताब्यात देण्यात आला. सदर कामगिरी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मेहबुब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली सपोफौ. श्री. पावणे, सपोफौ. श्री. जाधव, पो. हवा. पाटील, मपोना. शिंदे यांनी नमुद गुन्ह्याचे तपासात अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.
मुंबई सेंट्रल : दि. – २९/०९/२०२१ महिला प्रवाशी हिनल स्नेहल बन्साली. वय – २० प्रवासा दरम्यान त्यांचा सीटवर ठेवलेला एकुण – २४,०००/- रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन गहाळ झाल्याचे तक्रार नोंदवली. सदर मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी ठाणे अंमलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण स्टाफ यांना माहीती दिली. त्यावेळी नमुद स्टाफ यांनी तक्रारदार प्रवाशी महिला यांचे मोबाईल फोनचा गुगल अॅप फाईन्ड माय फोन याद्वारे शेवटचे लोकेशन पाहीले असता ते गोरेगाव ते मालाड स्टेशनचे मधिल यार्ड असे दाखवत असल्याने त्याठिकाणी शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. त्यावेळी यार्डात उभ्या असलेल्या लोकलमध्ये जाऊन चेक केले असत सदर मोबाईल त्यांना आढळून आला. मोबाईल ताब्यात घेवुन तो महिला प्रवाशी यांना दाखवला असता तो त्यांनी पाहुन ओळखुन त्यांचाच असल्याचे खात्रीने सांगितलेने तो सुस्थितीत त्यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. नमुद महिला प्रवाशी यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीसांचे आभार मानले. सदर कामगिरी मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. मेहबुब इनामदार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही. व्ही. जाधव, पो. ना. ए. व्ही. वळवी, पोलीस नाईक एन. एच. शळके यांनी नमुद मोबाईल फोनचे शोधार्थ अत्यंत महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे.
