मिरारोड (पुर्व) येथे दिनांक . २५ जानेवारी २०२१ रोजी एक महिला (फिर्यादी) हया त्यांचे कामावरुन घरी परत जात असताना हाटकेश चौक येथे अनोळखी आरोपीने फिर्यादी यांना रस्त्यात थांबवुन त्यांना बोलण्यात गुंतवुन त्यांचे लक्ष विचलीत केले त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन आपलेकडील रुमालात गुंडाळण्यास लावुन हातचालाखीने फसवणुक करुन लंपास केली.
सदर बाबत काशिमीरा पोलीस ठाणे गु.र.नं । ७७/२०२१ भादविस कलम ४२०, ३४ प्रमाणे दि.२५/०१/२०२१ रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयातील आरोपीतांचा सहायक पोलीस निरिक्षक. महेंद्र भामरे यांनी त्यांच्या पथकासह तांत्रीक माहितीच्या आधारे तपास करुन अहमदाबाद गुजरात येथे राहणारे ०५ आरोपिंना गुजरात राज्यातुन वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेवुन अटक करण्यात आली.
आरोपीकडे तपास केला असता आरोपींनी काशिमीरा पोलीस ठाणे येथे गुरनं १२१/२०२१ भादविस कलम ४२० गुरनं ७४७/२०२० भादविस कलम ४१९, १७०, ३४ प्रमाणे दाखल गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडूण आतापर्यंत ३०,०००/-
रुपये किंमतीची ११.२०० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली असुन अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी श्री अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, श्री विलास सानप, सहा.पोलीस आयुक्त मिरारोड विभाग, काशिमीरा पोलीस ठाणे चे वरिष्ठ’पोलीस निऱिक्षक. श्री संजय हजारे, पोलीस निऱिक्षक.विजय पवार, यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निऱिक्षक.महेंद्र भामरे, पोलीस उप निऱिक्षक.धनंजय गायकवाड, पोलीस उप निऱिक्षक. सागर साबळे, आणि पथक यांनी केली आहे.
