दिनांक २४. ०६. २०२१ रोजी ००. १५ वा चे सुमारास फिर्यादी हे मुंबई अहमदाबाद महामार्गाचे मुंबई वाहिनीचे बाजूस ओएफसी टेलिफोन केबल वायर जमिनीत टाकण्यासाठी ट्रेकर मशीनने चेकिंग करीत असताना यातील आरोपी यांनी आपसात संगणमत करून आर १५ करून फिर्यादी यांचे पॅन्टचे डाव्या खिशातील १२५००/- रू रोख रक्कम व फिर्यादीचे हातातील १००००/- रु किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल जबरीने चोरून पळून गेले. नमूद घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तलासरी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्याचा तपास सुरु असून टोळी प्रमुख आरोपी नाव गणेश उर्फ बोक लखमा दळवी वय २० रा. दळवीपाडा व त्याचे २ साथीदार यांनी केल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यातील ०३ आरोपीस पोलीस उप निरीक्षक श्री. अंकुश वारुंगसे व अंमलदार यांनी आरोपी यांचे मूळ राहते घरी उधवा दळवीपाडा तलासरी, जिल्हा पालघर येथून अटक केली आहे.
पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलीस स्टेशन तसेच दादरा नगर हवेली केंद्र शासित प्रदेशातील सेलवास व खानवेल या पोलीस स्टेशन मध्ये नमूद आरोपींवर शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकणे , जबरी चोरी, घरफोडी,चोरी करणे अश्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये टोळी प्रमुख गणेश उर्फ बोक लखमा दळवी यांचे विरुद्ध १० व टोळीचे सदस्य संग्राम दिवाल रावते यांचे विरुद्ध ०५ व टोळीचा सदस्य संदेश कान्हा अंधेर यांचे विरुद्ध ०३ असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
नमूद संघटित गुन्हेगारी टोळीकडून वर नमूद गुन्ह्यांव्यतिरिक्त जबरी चोरी व पाच घरफोडी व एक चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. श्री. दत्तात्रेय शिंदे , पोलीस अधीक्षक , व श्री. प्रकाश गायकवाड ,अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे मार्गदर्शनाखाली तपास श्री. धनाजी नलवडे , उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. दत्तात्रेय शिंदे , पोलीस अधीक्षक पालघर यांचे सूचनेप्रमाणे श्री. प्रकाश गायकवाड ,अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. धनाजी नलवडे , उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग पोनी . वसावे तलासरी पोलीस ठाणे , पोलीस उप निरीक्षक श्री अंकुश अंकुश वारुंगसे , तलासरी पोलीस ठाणे व तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
