वालीव पोलीस ठाणे हद्दीत महामार्गावर रणजित राधेश्याम यादव नामक व्यक्ती वाहनाने जात असताना त्याला बळजबरीने थांबून मारहाण करून रोख रक्कम चोरी करून तीन आरोपी फरार झाले. या संपूर्ण घटनेची तक्रार रणजित यादव यांनी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ९७१/२०२० भादविस कलम ३९७,३४ अन्वये दाखल केली.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. यांनी तात्काळ मार्गदर्शन करून आरोपींचा तपास घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिला. घटनास्थळावर मिळालेल्या तांत्रिक गोष्टीचा सहाय्याने तपास करून आरोपी नामे १)श्याम राठोड (वय ३५) २) रामेश्वर चव्हाण (वय ३१) ३)विनोद दुवे (वय४१) यांना गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. तपासणी करत असताना आरोपींकडून मोटर सायकल, मोबाईल आणि रोख रक्कम ५५,०००/- किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला.
सदर गुन्ह्याची कामगिरी माननीय श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ वसई-विरार, श्रीमती.अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विलास चौगुले पोलीस निरीक्षक श्री.चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मनोज मोरे व पथकाने केली आहे
