दिनांक १४/१०/२०२० रोजी सुमारे ००.४० वा.चे सुमारास मनोर पोलीस ठाणे हद्दीत मुंबई गाव मौजे हालोली पाडोसपाडा येथील समिरा हॉटेलचे समोर ता.जि.पालघर येथे काही इसम बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्रे व काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. सदर बातमीच्या आधारे सापळा रचुन आरोपी नामे सुशांत सुनिल सिनकर, वय-२५ वर्षे, रा.आनंद नगर, वसंत विहार, बी.विंग ४०२, दहिसर (पुर्व) मुंबई यांस ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता आरोपीकडुन खालील नमुद अग्नीशस्त्रे व काडतुसे विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कब्जात बाळगुन मिळुन आलेला आहे. १) १०,०००/-एक सिल्वर व तपकिरी रंगाचे देशी व गावठी बनावटीचे पिस्टल त्याचे मुठिस लाल रंग असलेला २)१०,०००/-एक काळया रंगाचे देशी व गावठी बनावटीचे पिस्टल ३) २०००/- ९ श्श् साईजचे ०८ जिवंत काडतुसे (राऊंड) ४)७००/-एक जांभळया रंगाचा नोकिया कंपनिचा मोबाईल हँडसेट असा एकुण २२,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी यांचे विरुद्ध मनोर पोलीस ठाणे गु.र.नं. ाा १७६/२०२० भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयातील आरोपी यास दि.१५/१०/२०२० रोजी ०४.५५ वाजता अटक करण्यात आली असुन आरोपी यांस ७ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर झालेला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि श्री. श्रीकांत कोळी, मनोर पोलीस ठाणे हे करित आहेत.
सदरची कारवाई श्री.विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे, प्रभारी अधिकारी, मनोर पोलीस ठाणे तसेच मनोर पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.
