मा.पोलीस अधीक्षक, पालघर श्री.दत्तात्रय शिंदे यांनी महामार्गावर होणा-या जबरी चोरी, दरोडा, ऑइल चोरी, अवैद्य माल वाहतुक यासारख्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता नियमित महामार्गावर पोलीस गस्त घालण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे मनोर ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असतांना दिनांक १३/१०/२०२० रोजी २०.१५ वाजताचे सुमारास मौजे आवंढाणी गावचे हद्दीत अहमदाबाद-मुंबई महामार्गावर मुंबई वाहिनीलगत असलेल्या सती माता पॅलेस हॉटेल परीसरात यातील आरोपी क्र.१)मुकेश विरसिंग राऊत, वय २७ वर्षे, याने आरोपी क्र.२)विकास खत्री रा.बोईसर याचे सांगणेवरुन त्याचे ताब्यातील टेंम्पो क्र.एम.एच ०४/इ.एल.५४०८ यामध्ये बायो डीझेल ज्वलनशील पदार्थाचा साठा विक्री करण्यातकरीता विना परवाना आपले कब्जात बाळगुन व साठवणुक करुन मानवी जीवन धोक्यात येईल व ज्वालाग्राही पादार्थाबाबत हयगयीचे वर्तन करुन जिवणावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे तरतुदींचे उल्लंघन करुन वाहतुक करित असताना मिळुन आला. सदर गुन्हयातील आरोपी यांचे ताब्यातुन १) २८८००/- रुपये किंमतीचे एकुण ४५० लिटर डिझेल, २) ३३६००/- रुपये किंमतीचे एकुण ५२५ लिटर डिझेल, ३) १७२८०/- रुपये किंमतीचे एकुण २७० लिटर डिझेल, ४) ४४१६०/- रुपये किंमतीचे ६९० लिटर डिझेल, ५) ४६०८०/- रुपये किंमतीचे एकुण ७२० लिटर डिझेल, ६) १२८००/- रुपये किंमतीचे एकुण २०० लिटर डिझेल, ७) ६४००/- रुपये किंमतीचे एक स़फेद रंगाचा प्लॅस्टीकचा चौकोणी बॅरेल लोखंडी ब्रॅकेटमध्ये फिटींग केलेले ८) १०,०००/- रुपये किंमतीचे एक निळ्या व स़फेद रंगाची पंप मशिन, त्यास समोरील बाजुस चौकोणी डिस्ल्पे व त्याखाली किपॅड असलेला लोखंडी ब्रॅकेटमध्ये फिटींग केलेली ९) ५००/- एक सुमारे १८.५ फुट लांबीचा काळ्या रंगाचा रबरी पंप असा एकुण १,९९,६२०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन मनोर पोलीस ठाणे गु.र.नं.१७५/२०२० भा.द.वि.सं. कलम-२८५,३४ सह जिवनावश्य वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ७ प्रमाणे, गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई श्री.विकास नाईक, उपविभागिय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, सपोनि/श्री.प्रताप दराडे, प्रभारी अधिकारी मनोर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
