मा.जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्रमांक- पालघर/कोरोना विषाणू/प्रतिबंधात्मक आदेश/कावि/३५६/२०/दि.३१/०७/२०२० अन्वये पालघर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत फौ.प्र.संहीता १९७३ चे कलम १४४ अन्वये दि ३१/०७/२०२० अन्वये मनाई आदेश लागु असल्याचे माहीत असतांना सुध्दा पालघर जिल्हयात गणपती विसर्जन मिरवणुकीत मिरवणुकीत ५ किंवा ५ पेक्षा जास्त इसमांनी इसमांनी सहभाग केलेप्रकरणी पालघर जिल्हयात खालील प्रमाणे ०७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता मा.जिल्हाधिकारी, पालघर यांनी पाच पेक्षा अधिक इसम एकत्र जमणार नाही, असा मनाई आदेश काढलेला असतांना देखील पाच पेक्षा अधिक इसम एकत्र जमुन गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्याने ९४ आरोपी यांचेवर वरील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी नागरीकांना पालघर पोलीस दलाकडुन आवाहन करण्यात येते की, शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये या करिता शासनास सहकार्य करावे. अन्यथा आपणास सुध्दा अशा प्रकारच्या कारवाईस सामोरे जावे लागेल.
