ठाणे : पियुषपाणी जैन मंदिर, वर्सावागांव ता. जि.ठाणे येथील मंदिरातील दानपेट्या दिनांक ३०/१/२०२२ या रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फोडुन त्यातील अंदाजे ५०,०००/- रुपये रक्कम लबाडीच्या इरादयाने चोरी केल्याबाबत हरीष रतीलाल सलोत वय ६८ वर्ष यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली त्यावरून अज्ञात चोरट्या विरुद्ध काशिमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
काशिमीरा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सपोनि/प्रशांत गांगुर्डे व त्यांच्या सहकारी यांनी नमुद गुन्हयांचे घटनास्थळापासुन ते आरोपीत पळुन गेलेल्या मार्गावरचे सुमारे १०० ते ११० सी.सी.टि.व्ही. फुटेजची बारकाईने तपासणी व तांत्रीक विश्लेशन करुन त्या आधारे भिवंडी, मालवणी व वडाळा मुबंई येथुन मंदिराची दानपेटी फोडणारे आरोपी १) समसुदा कुरेशी वय ३० वर्ष रा. खाडीपार, ता.भिवंडी २) सईद खान वय ४२ वर्ष रा.मालाड (प) ३) इम्रान शेख वय २२ वर्ष रा. वडाळा (पुर्व)यांना ताब्यात घेऊन कसोशीने तपास केला असता आरोपीणी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपी यांनी या प्रकारचे अजून ३ गुन्हयांची कबुली पोलिसांना दिली आहे. यावरून आरोपी यांना दिनांक ०३/०२/२०२२ रोजी वालीव पोलिसांनी अटक केलेली आहे. सदर बाबत अधिक तपास चालू आहे.
सदरची कामगीरी श्री अमित काळे पोलीस उपआयुक्त परीमंडळ-०१, श्री विलास सानप सहाय्यक पोलीस आयुक्त मिरारोड विभाग, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.निरी/श्री संजय हजारे, पोनि/श्री विजय पवार (गुन्हे), स.पो.निरी/श्री प्रशांत गांगुर्डे, सहा.फौज./प्रकाश कावरे, पो.ना.विश्वनाथ जरग, सचिन हुले, पो.शि. हनुमंत तेरवे, समीर यादव, सुधीर खोत, अनिल नागरे, सनी सुर्यवशी सर्व नेमणुक काशिमीरा पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.
