दिनांक :०५/१०/२०२१ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये स्थलांतरित नागरिकांचे वास्तव्याचे प्रमाणात मोठया संख्येने वाढ झालेली आहे. स्थलांतरित इसमांना घर, सदनिका, हॉटेल, जागा, इत्यादी भाडे तत्वावर देतांना संबंधित घरमालक हे भाडेकरुंच्या ओळखीबाबत कोणतीही शहानिशा न करता नागरिकांना घरे भाडयाने देतात व त्यांच्याकडून ओळखीबाबत कोणतेही कागदपत्रे घेत नाहीत असे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही लोक अवैध व्यवसाय, गुन्हे व समाज विरोधी कृत्यांमध्ये सामील असल्याचे दिसुन आले आहे, अशा काही इसमांमुळे निर्माण होऊ शकणा-या संकटावर प्रतिबंध करण्यासाठी त्यांची माहिती पोलीस ठाण्यास अद्यावत करणे आवश्यक आहे.
त्याकरीता मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना निवासी क्षेत्रामध्ये सदनिका/ फ्लॅट, घर, दुकाने, हॉटेल, जागा इत्यादी भाडेतत्वावर देतांना संबंधित मालकांनी, भाडेकरू इसमांनी, सोसायटीचे चेअरमन व इस्टेट एजंट यांनी संबंधित पोलीस ठाणेस भाडेकरुंबाबतची आवश्यक ती माहिती व कागदपत्रे ०३ दिवसांचे आत ईमेल किंवा टपालाद्वारे देण्याबाबतचे आदेश श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मिरा-भाईंदर वसई-विरार यांनी जारी केले आहेत. सदरचे आदेश हे दिनांक ०५/१०/२०२१ रोजीचे ००.०१ ते दिनांक ०२/११/२०२१ रोजीचे २४.०० वा.पर्यंत लागु राहतील. सदरची माहिती पोलीस आयुक्ताल यांचे वेबसाईट www.mbvv.mahapolice.gov.in द्वारे देखील पोलीस ठाण्याला देता येईल.
