मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयात स्थलांतरित नागरिकांचे वास्तव्याचे प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झालेली आहे. स्थलांतरित इसमांना घर, सदनिका, हॉटेल, जागा, इत्यादी भाडेतत्त्वावर देताना संबंधित घर मालक हे भाडेकरूच्या ओळखी बाबत कोणतीही शहानिशा न करता नागरिकांना घरे भाड्याने देतात व त्यांच्याकडून ओळखी बाबत कोणतेही कागदपत्रे घेत नाहीत असे निदर्शनास आले आहे.
त्यापैकी काही लोक अवैध व्यवसाय गुन्हे व समाज विरोधी कृत्यांमध्ये सामील असल्याचे दिसून आले आहे. अशा काही इसमांमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या संकटांवर प्रतिबंध करण्यासाठी त्यांची माहिती पोलिस ठाण्यात अद्यावत करणे आवश्यक आहे.
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील निवासी क्षेत्रात घर मालक यांनी सदनिका/ फ्लॅट, घर, हॉटेल, दुकान ,जागा भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूची शहानिशा करून संबंधित पोलीस ठाण्यात अवगत भाडेकरूंची माहिती सादर करणेबाबत सीआरपीसी १४४ (१)(३)अन्वये आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत व नागरिकांनी निवासी क्षेत्रांमध्ये सदनिका/फ्लॅट, घर दुकाने हॉटेल जागा इत्यादी नागरिकांना भाडेतत्वावर देताना संबंधित मालकांनी भाडेकरू इसमांनी व इस्टेट एजंट यांनी खालील नमूद मुद्द्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यास पुरववी असे आदेश देण्यात आले आहे.
१) भाडेकरूंच्या ओळखी बाबत त्याचे मूळ वास्तव्याचा पुरावा किंवा ओळखपत्राचा पुरावा,
२) परकीय नागरिक संदर्भाने त्याचे पासपोर्टची झेरॉक्स आणि व्हिजाची झेराॅक्स,
३) भाडेकरू इसमांचे नजीकच्या काळातील छायाचित्र,
४) भाडेकरू इसमांचे मूळ वास्तव्याचा पत्ता तेथील पोलीस ठाण्याचे नाव नोकरीचे/ व्यवसायाचे ठिकाण असे कागदपत्रे प्राप्त करून संबंधित पोलीस ठाण्यात ३ दिवसाचे आत माहिती द्यावी.
भाडेकरू इसमांची माहिती संबंधित पोलीस ठाण्याचे ईमेलवर, टपालाद्वारे किंवा पोलीस आयुक्तालयाचे वेबसाईट www.mbvv.mahapolice.gov.in वर द्यावी. जे कोणी सदर आदेशाचा भंग करतील ते भारतीय दंड संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र ठरतील.
