मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा बिल्लींग, मिरारोड पुर्व या ठिकाणी अल्पवयीन मुलीकडुन जबरदस्तीने कौमार्यभंग करण्याकरीता जास्त रक्कम घेवुन वेश्या व्यवयसाय चालवीला जात असल्याची बातमी मिळाली वरुन अमावाशा, भाईदरचे वपोनि/श्री. संपतराव पाटील यांनी पथकासह सदर ठिकाणच्या पत्त्यावर बोगस गि-हाईक पाठवुन छापा टाकला. तेव्हा तेथे वेश्या दलाल महिला वय-२७ वर्षे, रा. म्हाडा बिल्डींग, मिरारोड पुर्व, मुळ रा. राज्य मध्यप्रदेश हिला ताब्यात घेवुन, १६ वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलीची सुटका केली.
सदरची महिला आरोपीने आल्पवयीन मुलीचे कौमार्यभंग करण्याकरीता १,००,०००/- रुपये ठरवुन ते स्वीकारल्याने आरोपी विरुध्द मिरारोड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७१/२०२१ भादविसं कलम ३६६ (अ), ३७० सह अने. प्रतिबंध कायदा १९५६ कलम ४,५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईदरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संपतराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक श्री. देविदास हंडोर, आणि पथक यांनी केली आहे.
