भाईंदर रेल्वे स्टेशन परिसरात चालणा-या वेश्या व्यवसायावर कारवाई करुन ०६ पिडित मुलींची सुटका.

Crime News

भाईंदर  : भाईंदर रेल्वे स्टेशन समोर, रिक्षा स्टॅन्डलगत असलेल्या साईबाबा स्वीट आणि फरसाण मार्ट या दुकानाच्या बाजुस, भाईंदर पश्चिम येथे एक महिला वेश्यादलाल नामे मोयना हि पुरुष गि-हाईकांना वेश्यागमनाच्या मोबदल्यात मुली पुरविते अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेचे वपोनि श्री. एस.एस.पाटील यांना मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. एस.एस.पाटील यांनी पथकासह नमुद ठिकाणी बोगस गि-हाईक व पंच यांना पाठवुन मिळालेल्या गोपनीय बातमीची सत्यता पडताळुन दि.०९.०८.२०२१ रोजी १०.४५ वा. छापा टाकला असता महिला वेश्यादलाल नामे मोयना आरिफ खातुन मंडळ, वय-३२ वर्ष, रा. उमेला, नायगाव (प.) ता.वसई, जि.पालघर, मुळ रा. चौविस परगाना, राज्य-पं.बंगाल ही वेश्यागमनाच्या मोबदल्यात पुरुष गि-हाईकाकडुन पैसे स्वीकारुन मुली पुरवित असतांना मिळुन आल्याने तिला वेश्यगमनाकरीता स्वीकारलेल्या रक्कमेसह ताब्यात घेवुन ०६ मुलींची सुटका केली. सदर बाबत महिला वेश्यादलाल मोयना आरिफ खातुन मंडळ, वय-३२ वर्ष, हिचे विरुध्द भाईंदर पोलीस ठाणे येथे पो.हवा विजय विनायक ढेमरे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन भाईंदर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

___ सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर विभागाचे श्री. संपतराव पाटील वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोहवा. विजय ढेमरे, रामचंद्र पाटील, पो.ना.यम्बर, कमल चव्हाण, केशव शिंदे, गावडे व भाईंदर पोलीस ठाण्याचे श्री. बगदाने पोउप.निरी, श्री ढलपे सहा.पो.उप.निरी, पो.ना.सोनावणे यांनी केली आहे.

 

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply