काशिमिरा(दि.२२) : ४२ किलो वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ बाळगणा-या ०३ ईसमांवर कारवाई, काशिमिरा पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.मिळालेल्या माहितीनुसार काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप कदम यांना काही इसम हे दिनांक १८/०५/२०२३ रोजी गांजा हा अंमली पदार्थ काशिमिरा पोलीस ठाणे हददीत विक्री करण्याकरीता येणार असल्याची गुप्त बातमी मिळावी होती त्यानुसार त्यांनी पो. नि. श्री. कुमारगौरव धादवड ( गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.निरी. श्री प्रशांत गांगुर्डे व पथक यांना कायदेशिर बाबींची पुर्तता करुन कार्यवाही करण्यासाठी आदेशित केल्याने नमुद पथकाने घोडबंदर गावाच्या हद्दीत जुना बंद टोल नाका जवळ इसम १) अभिषेक देवीदास वाघ, वय २५ वर्षे, रा. दहीसर पुर्व, मुंबई., २) अभिषेक जसवंत सिंग, वय २० वर्षे, रा. नायगांव पुर्व, जिल्हा पालघर. (३) कुलदीप गुरनाम सिंग वय २५ वर्षे, रा. नायगांव पुर्व जिल्हा पालघर यांना त्यांच्या ताब्यातील रिक्षा सह ताब्यात घेतले व सदर रिक्षाची झडती घेतली असता त्यात चार प्लास्टीकच्या गोण्या मिळून आल्याने सदर गोण्यांची तपासणी केली असता त्यात ४,२०,००० /- रुपये किंमतीचा ४२ किलो गांजा हा अंमली पदार्थ’ मिळुन आला.
नमुद आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचा गांजा नावाचा अंमली पदार्थ हा ओरीसा राज्य येथुन विक्रीसाठी आणला असल्याची माहीती पोलिसांना मिळाली आहे. सदर आरोपी यांच्या कडुन ४२ किलोग्रॅम वजनाचा गांजा तसेच गुन्हयात वापरलेली रिक्षा असे एकूण ४,७०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीनं विरुध्द काशिमीरा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद अटक आरोपी हे सध्या पोलीस कोठडीत आहेत.
सदर कामगिरी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, श्री. विलास सानप, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. संदीप कदम, पो. नि. श्री. कुमारगौरव धादवड (गुन्हे), स.पो.निरी. श्री. प्रशांत गांगुर्डे, स.फौ.अनिल पवार, पो.हवा. सचिन हुले, निलेश शिंदे, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे, पो. अंम. रविंद्र कांबळे, प्रविण टोबरे व पो.हवा. जयप्रकाश जाधव नेम. पो. उ. आ. कार्यालय, परिमंडळ ०१ यांनी केलेली आहे.
