दिनांक १३.०८.२०२१ रोजी ‘नवघर पोलीस ठाणे हद्दित आर्का इन्व्हेस्टमेंट शॉप नं. ११०, अन्नपुर्णा हाईट्स, राजस्थान मेडीकल जवळ, भाईंदर पुर्व येथे अनधिकृतपणे ऑनलाईन जुगार चालु आहे.’अशी माहिती श्री. अमीत काळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, यांना गुप्त माहितगारामार्फत मिळाली. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने परिमंडळ-१ कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्त छापा कारवाई केली. आरोपीतांनी तयार केलेल्या वेब पेजच्या आधारे लोकांची ऑनलाईन फसवणुक करुन जुगार/लॉटरी चालवित असल्याचे छापा कारवाई दरम्यान दिसुन आले. सदर बाबत नवघर पोलीस ठाणे गुन्हा करण्यात आलेला असून नमुद गुन्हयात ३ आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे व २ आरोपीतांचा शोध सुरु आहे. सदरच्या छापा कारवाई दरम्यान ऑन लाईन जुगार खेळण्यासाठी वापर करीत असलेले कॉम्प्युटर, मॉनीटर, सी.पी.यु. असे साहित्य जप्त करण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१, डॉ. श्री. शशिकांत भोसले, सहा. पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, परिमंडळ-१ कार्यालय येथील सपोनि. लोंडे, पोहवा. मांडुळे, पोना. पाटील, पोशि. चव्हाण, मपोशि. एक्कलदेवी व नवघर पोलीस ठाण्याचे पोउनि. भगवान पाटील, पोशि. घोडे, पोशि. ढोले यांनी केलेली आहे.
