भाईंदर पश्चिम येथील अत्यंत क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याची उकल करून ३ आरोपी ताब्यात गुन्हे शाखा युनिट १ काशिमीरा यांची कामगिरी.

Crime News

भाईंदर :  दिनांक २१/०७/२०२१ रोजी भाईंदर पश्चिम येथे राहणारे श्री. लाला सुग्रीव वर्मा वय : ३१  यांनी त्यांची पत्नी सौ. सुमन लाला वर्मा वय : २६ ह्या घरात एकट्या असतांना कोणीतरी अज्ञात आरोपी याने चोरी करण्याच्या उद्देशाने येऊन कोणत्यातरी साधनाने त्यांचा गळा आवळून जीवे ठार मारून त्यांचे अंगावरील ३५,८००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व बॅगेत असलेले आधारकार्ड, एटीएम , इस्त्री, साउंड बॉक्स, असे सामान चोरी करून लुटून नेले अशी तक्रार श्री लाला वर्मा यांनी भाईंदर पोलीस ठाणे येथे नोंदविली त्याप्रमाणे दि. २३/०७/२०२१ रोजी आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नसतांना गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा , यांनी गुन्ह्यातील घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून व तांत्रिक बाबीचा वापर करून तसेच साक्षीदारांकडे विचारपूस करून सदरचा गुन्हा कुणी केलेला असावा याची अचूक माहित काढून गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलीस पथक जि . बलिया , राज्य उत्तरप्रदेश येथे रवाना झाले . सदर पथकाने उत्तर प्रदेश मध्ये एस.टी. एफ पथकाची मदत घेऊन वर नमूद गुन्हयातील संशयित आरोपींचा शोध घेऊन आरोपी नाव १) सोनू विजय चौहान वय :३०, रा. गालाफपुर उत्तर प्रदेश २) सुधिरकुमार तुलसी चौहान वय : १९ रा. कुसबरी उत्तर प्रदेश ३) मुन्नी कुलदीप चौहान वय ३२ रा. रक्षा डीनीया उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपास करता त्यांनी सदरचा गुन्हा चोरी करण्याचे उद्देशाने केल्याची कबुली दिली . सदरील गुन्हयांमध्ये प्रत्यक्षदर्शी व्यक्ती किंवा पुरावा नसतांना गुन्हे शाखेने अंत्यत कौशल्यपूर्ण तपास करून यातील अज्ञात आरोपीना ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कामगिरी डॉ . महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त , अति . कार्यभार (गुन्हे ) श्री. रामचंद्र देशमुख , सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि . जितेंद्र वनकोटी , मध्यवर्ती गुन्हे शाखा ,पोनि . अविराज कुराडे , सपोनि . विलास कुटे , निलेश शेवाळे , पोउपनि . हितेंद्र विचारे, सहा. पोउपनि . वेदपाठक, राजू तांबे , पोहवा संदीप शिंदे, किशोर वाडिले , अर्जुन जाधव , संजय शिंदे, अविनाश गर्जे , पोना. पुष्पेंद्र थापा , सचिन सावंत , पो. शि . विकास राजपूत , सर्व नेम. गुन्हे प्रकटीकरण शाखा-१ तसेच मध्यवर्ती प्रकटीकरण कक्षाचे पो.शि . सतीश जगताप व पो. शि  महेश वेल्हे यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे .

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply