गोरेगाव : डॉक्टर वाडीलाल लखमशी शहा, वय ७६ , यांचे श्री निकेतन बिल्डींग, गोरेगाव पुर्व, येथे श्री क्लीनीक असून दिनांक दिनांक १५/०९/२०२१ रोजी ०५.०० वा. चे सुमारास यांच्या दवाखान्याच्या शेजारी असलेल्या केमीस्टमधील मुलाने त्यांच्याकडे बंद लिफाफ्यात असलेले पत्र आणून दिले.सदरचे पत्र बंद लिफाफ्यात असल्यामुळे शहा यांनी त्याकडे जास्त लक्ष न देता रात्री त्यांच्या कुटुंबीयां समक्ष उघडुन पाहिला असता त्यामध्ये ‘लाल सलाम संघटनेच्या लेटरहेडवर ‘एस.के. मादोरे’ नावाने लिहिले होते व त्यात ५० लाख रुपयांची खंडणी मागितली व ती न दिल्यास त्यांच्या जिवे ठार मारण्याची धमकी’ दिली होती मजकूर वाचून डॉ . शहा व त्यांचे कुटुंबीय घाबरून गेले. त्यानंतर डॉ . शहा यांनी त्यांच्या मित्रासह वनराई पोलीस ठाणे गाठुन घडलेली हकीकत पोलीसांना सांगितली असता पोलीसांनी त्यांना विश्वासात घेवुन धिर दिला व गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.
देशात अतिरेकी हालचालीमुळे सर्व संरक्षण यंत्रणांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झालेले असताना वर नमुद गुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरू नये म्हणुन मा. वरिष्ठांनी सदर गुन्हयाची गंभीर दखल घेवुन. कक्ष-१२ चे अधिकारी व अंमलदार यांची चार पथके तयार केली. त्यांना पोलीस ठाणे व आजुबाजुच्या परिसरात रवाना केली. सदरच्या पथकाने आरोपी गुन्हा करून जात असलेल्या मार्गातील बरेचसे सीसीटीव्ही फुटेजची पाहाणी करून, तांत्रीक विश्लेषण करून बुरखाधारी महिलेची ओळख पटवली व त्याआधारे विरार, नवी मुंबई, पालघर, गोरेगाव, मालाड या परिसरात कसुन शोध घेवुन ३६ तासां च्या अथक प्रयत्न करून गुन्हयातील सर्व आरोपींना शिताफीने, तांत्रीक व मानवी कौश्यल्याचा वापर करून ०३ आरोपींना ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पैशाची अत्यंत गरज असल्याने तसेच डॉ. शहा हे आरोपी याचे फॅमीली डॉक्टर असल्याने त्यांच्या पारिवारीक व आर्थिक परिस्थीती बाबत त्यांना परिपुर्ण माहिती होती. सदर ओरोपीनी ‘यु- टयुब’ व्हीडीओ पाहुन त्यातून शक्कल लढवून पैश्यासाठी गुन्हा केल्याचे पोलीस चौकशी दरम्यान कबूल केले .ताब्यात घेण्यात आलेल्या तिनही आरोपींना पुढील कार्यवाही करिता वनराई पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त(गुन्हे) श्री. मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. एस. विरेश प्रभु, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), श्री. दत्ता नलावडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (प्र-उत्तर), श्री. नितीन अलकनुरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे, पोलीस निरीक्षक विलास भोसले, सचिन गवस, अतुल डहाके, सपोनि. बाळासाहेब कानवडे, विजय रासकर, आशिष शेळके, पोउनि खानविलकर, सफौ. चव्हाण, कारंडे, पोह शिंदे, पारकर, बागवे, खान, कल्पेश सावंत, लिम्हण, चव्हाण, संतोष राणे, अहिरे, संतोष बने, पोना मोरे, शैलेश बिचकर, अमोल राणे, गोरूले, सोनवणे, पोशि विशाल गोमे, सचिन जाधव, शिरसाट, धोत्रे, मपोना स्वप्नाली मोरे, सुनिता भेकरे, पोहचा मोरे, पोनाचा आव्हाड यांनी पार पाडलेली आहे.
