बोईसर येथील साई शॉपिंग सेंटर मधील मंगलमय ज्वेलर्स दुकानामध्ये दिनांक. २९/१२/२०२० ते ३०/१२/२०२० रोजी ०८:३०वाजताच्या दरम्यान घरफोडी झाली होती सदर घरफोडीत आरोपी यांनी दुकानातील तिजोरी व ड्राव्हर गॅस कटरच्या सहाय्याने तोडून ७,००,१७,२३५/- रुपये किमतीचे सोने दागिने व ६०,००,०००/- रोख रक्कम असे एकूण ७,६०,१७,२३४/- रुपये किमतीचा माल घरफोडी चोरी करून नेला. त्यावरून सदर दुकानाचे मालक यांनी आरोपी विरुद्ध दिनांक. २९/१२/२०२० रोजी बोईसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३२०/२०२० भादविसं कलम ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. दत्तात्रय शिंदे पोलीस अधीक्षक पालघर यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे ४ वेगवेगळे पथक तयार करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पोलीस उप निरीक्षक आशिष पाटील स्थानिक गुन्हे शाखा बोईसर पोलीस उपनिरीक्षक. योगेश कोंडे बोईसर पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील बोईसर पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.गीताराम शेवाळे मुख्यालय असे चार पथक तयार करून झारखंड राज्यात पाठविण्यात आले. सदर पथकाने गुप्त बातमीदार मार्फत माहिती काढली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी बदरुद्दीन कादीर शेख व हासिम फैजुद्दीन शेख राहायला ता. राजमहाल जि. साहिबगंज राज्य- झारखंड यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे सखोल चौकशी करून आरोपी हे सदरच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. आरोपी यांच्या ताब्यातून ३२४.८००ग्रॅम सोने (१४लाख रुपये) व ५,५०,०००/- रुपये रोख रक्कम असा एकूण १९,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील उर्वरित आरोपी यांचा शोध घेण्याकरिता १) सहाय्यक पोलीस निरीक्षक. श्री. प्रदीप पाटील वाडा, पोलीस ठाणे २)सहाय्यक पोलीस निरीक्षक.श्री.गजानन पडाळकर पालघर पोलीस ठाणे ३) सहाय्यक पोलीस निरीक्षक.श्री.विलास जाधव, तलासरी पोलीस ठाणे ४) पोलीस उपनिरीक्षक. अल्पेश विशे वाणगांव पोलीस ठाणे ५)पोलीस उपनिरीक्षक.अजित कणसे, मनोर पोलीस ठाणे ६) पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे, बोईसर पोलीस ठाणे असे ६ पथक तयार करून झारखंड व पश्चिम बंगाल येथे रवाना करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप कसबे, बोईसर पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी श्री दत्तात्रय शिंदे पोलीस अधीक्षक, पालघर, यांच्या सूचनेप्रमाणे श्री.प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री विश्वास वळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच पथक यांनी केली.
