पालघर येथील वाणगांव खडखडा येथे राहणारा आरोपी नामे, बाबुलाल नथुलाल जैन (वय-४९) याने त्याच्या दुकानाच्या पाठीमागे गावठी हातभट्टीची दारू तयार करनारे उपयोगाचे सामान स्वतःच्या फायद्याकरिता विनापरवाना गैरकायदा प्रोव्हीबीशन गुन्ह्याचा माल आपल्या ताब्यत बाळगून असल्याचे वाणगांव पोलीसांना मिळून आले. सदरची घटना दि.४/१/२०२१ रोजी सुमारे ५:०० च्या दरम्यान घडली.
आरोपीच्या ताब्यातून १) ४,०००/- रु. किमतीच्या प्लॉस्टिकच्या सफेद रंगाच्या एकूण ०२ गोणी प्रत्येकी गोण ५० किलो वजनाची अश्या एकूण दोन गोण्या त्यामधून एकूण १०० किलो काळा गूळ त्याची किंमत प्रती ४० रु. प्रमाणे २) ४०००/- रु. किमतीच्या बारदानाच्या एकूण ०२ गोणी प्रत्येकी ५० किलो वजनाची अश्या एकूण दोन गोण्या त्यामधून एकूण १०० किलो काळा गूळ त्याची किंमत प्रती ४० रु. प्रमाणे ३) ७५०/- रु किमतीच्या एक सफेद रंगाची प्लास्टिकची गोण त्यामध्ये १५ किलो वजनाची नवसागर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे उपयोगाचा नवसागर असा एकूण ०८,७५०/- रु किमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
सदर आरोपी विरुद्ध वाणगांव पोलीस ठाणे गुन्हा गु रजि क्र. ०२/२०२१ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (फ) प्रमाणे, दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई सहायक पोलीस आयुक्त. श्रीकांत शिंदे, प्रभारी अधिकारी वाणगांव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
