दिनांक. २४/१०/२०२० रोजी सुमारे २ च्या दरम्यान कासा पोलीस ठाणे हद्दीत अहमदाबाद मुंबई हायवेवर महालक्ष्मी विवळवेढेगाव येथे, बेकायदेशीर मद्याचे वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली.आरोपीचे नाव.रवींद्र शंकर वाडकर,वय ३४ वर्षे राहायला यंबुर पालघर येथे.
या आरोपीकडे सफेद रंगाची एक्टीव्हा असून त्याच्याकडे वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना ९,३६०/रुपये किंमतीचा इंपेरिअर ब्लू असे इंग्रजीत लिहिलेल्या दमन बनावटीच्या मद्याचे ३ बॉक्स प्रोव्हिबिशन गुन्ह्याचा माल स्वतःकडे बाळगून बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे पोलीसांना आढळून आले.
आरोपीच्या ताब्यातून तब्बल एकूण ५४,३६०/रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
सदर आरोपी रवींद्र वाडकर याच्याविरोधात कासा पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र.१८०/२०२० महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
सदर गुन्ह्याची कारवाई स.पो.नि.उमेश पाटील प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कासा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
