जव्हार पोलीस ठाणे हद्दीत खंबाळा दूरक्षेत्र चौकी, तालुका.जव्हार, जिल्हा पालघर येथे आरोपी नामे. दिपक दिनकर भोगे (वय-२९) राहायला नाशिक यांनी त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची सफेद रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी यातून अवैधरीत्या विनापरवाना प्रोव्हिशन गुन्ह्याचा माल स्वतः जवळ बाळगून विक्री करण्यासाठी जात असताना मिळून आला.
सदर आरोपीच्या ताब्यातून १) २,०००००/- रुपये किंमतीची एक चारचाकी मारुती सुझुकी कंपनीची सफेद रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी २) ६,२४०/- किमतीचे मॅकडॉल कंपनीचे १८० मिली मापाच्या ९६ सीलबंद बाटल्या ३) ३,३६०/-रुपये किमतीच्या स्टॉलींग कंपनीचे ७५० मिली मापाच्या एकूण १२ सीलबंद बाटल्या ४) ६,०७२ /- रुपये किंमतीच्या मॅकन्टाॅस कंपनीचे ७५० मिली मापाच्या एकूण १२ सीलबंद बाटल्या ५) ३,३६०/- रुपये किंमतीचा रॉयल स्टॅग कंपनीचे ७५० मिली मापाच्या एकूण १२ सीलबंद बाटल्या असा एकूण २,१९,०३२ रुपये किंमतीचा मुद्देमाल दिनांक. १९/१२/२०२० रोजी ७:४५ वाजता सुमारात करण्यात आला.
सदर आरोपी विरोधात जव्हार पोलीस ठाणे गुन्हा रोजी क्र. १८९/२०२० महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगर प्रभारी अधिकारी जव्हार पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली.
