बनावट बँक अधिकारी बनून ग्राहकांना कर्ज देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी केली अटक.

Crime News Cyber Crime Latest News Political News ताज्या घडामोडी

मिरारोड (दि.२०) : टाटा कॅपिटल कंपनीचा बॅक अधिकारी असल्याचे भासवुन व्यवसायिक कर्ज मंजुर करुन देतो असे सांगुन दुकानदारांची फसवणुक करणा-या आंतरराज्यीय टोळीतील आरोपीस अटक मिरारोड पोलीस ठाणेची कामगिरी अधिक माहितीनुसार दिनांक ०३/०४/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाणे हद्दीतील दीप सागर दुकानाचे मालक सागर रोहिदास काळे, रा. सहकार प्रीमिअर, कनकिया रोड मिरारोड पुर्व हे आपल्या दुकानात असतांना एक इसम त्यांच्या दुकानात आला व तो टाटा कॅपीटल बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगुन बिझनेस लोन मंजुर करुन देतो असे सांगितले व  फिर्यादी  सागर काळे यांचा विश्वास  संपादन करुन फिर्यादी त्यांच्या कडुन एच.डी.एफ.सी बँकेचे कॅन्सल चेक घेतले. सदर  कॅन्सल चेक फिर्यादी यांच्या  एच.डीएफसी बँकेत वटवुन सागर काळे  यांची एकुण ०१,१८,००० /- रुपये किंमती फसवणुक केली याबाबत त्यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांनी मिरारोड पोलीस ठाणेतील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे करुन विशेष शोध पथकाची नियुक्ती केली होती.सदर गुन्हयाच्या तपासादरम्यान मिरारोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयातील आरोपींनी  वापरलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदर गुन्हयातील आरोपी हे एक मोबाईल नंबर फक्त दोन ते तीन दिवस गुन्हा करण्यासाठी वापरत असल्याने निदर्शनास आल्याने सदर आरोपी यांचा शोध घेणे पोलिसांना जिकरीचे झाले होते.  गुन्हयातील आरोपी यांनी वापरलेले मोबाईल क्रमांक व त्यातुन मिळालेले मोबाईलचे आयएमईआय क्रमांकावर पोलिसांनी पाळत ठेवली असता दिनांक १४/०६/२०२३ रोजी नमुद गुन्हयातील आरोपी हे अहमदनगर याठिकाणी गुन्हे करण्याच्या तयारीत असल्याची निदर्शनास आले व सदर आरोपी पळुन जावुन नये म्हणुन आरोपीबाबत अहमदनगर येथील स्थानिक दुकानदारास माहिती देवुन स्थानिक पोलीस ठाणेच्या मदतीने आरोपीना  पकडण्यात आले. सदर गुन्हयात आरोपी १) मोहम्मद अब्दुल कुद्दुस मेहबुब, रा. उर्दु शाळेजवळ, ता. लखना,  राज्य झारखंड २) एतेशाम एमडीनईम आलम,रा. ३०/२४, ईचारण, घोसलाई, कोलकत्ता ३) अजीज लतीफ शेख, रा. २८ / ए, मोमीनपुर रोड, कोलकत्ता ४) मुकेशकुमार दुर्याधन नायक, रा. २३४ / एसीजी बोस रोड, कोलकत्ता, प. बंगाल ५) गंगा लक्ष्मी साहु, रा. सोनारपुर, २४ परगाना, कोलकत्ता यांचा मिरारोड पोलीस ठाणेत दाखल असलेल्या वर नमुद गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दिनांक १८/०६/२०२३ रोजी अटक करण्यात आले आहे. नमुद अटक आरोपी यांची पोलिसांनी अधिक चौकशी केली  असता त्यांनी गेले एक ते दीड वर्षापासुन अशा प्रकारचे गुन्हे मिरा, भाईंदर, वसई, विरार, मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर, अहमदनगर, नाशिक, नागपुर तसेच तेलंगणा व सुरत गुजरात राज्यात केले असल्याची माहिती मिळाली आहे. सदर आरोपींकडून आणखी ०३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, मिरारोड, श्री. महेश तरडे, सहायक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह बागल, स. पो. नि. शिवकुमार गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पा.नि. हनिफ शेख, पो.उप.नि. किरण वंजारी, स. फौ. प्रशांत महाले, पो. हवा. प्रफुल्ल महाकुलकर, प्रदीप गाडेकर, बालाजी हरणे, पो. अंम. शंभु शेळके, अथर्व देवरे यांनी केलेली आहे.

 

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply