घोडबंदर :फायरींगच्या गुन्हयातील ६ आरोपींना २४ तासाच्या आत पकडण्यात गुन्हे शाखेस यश. मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी याने पोलिसांना माहिती दिल्यामुळे आरोपी यांनी मनात राग धरून दिनांक २/६/२०२२ रोजी रात्री १ च्या सुमारास आरोपी यांनी एक मोटार सायकल व चारचाकी वाहनातुन फिर्यादी यांचा पाठलाग केला त्यांना घाबरून फिर्यादी आडोश्याला लपून राहीले . ती मोटार सायकल व चारचाकी वाहन पुढे गेल्यानंतर वैभव शेठच्या कंपनीजवळ, घोडबंदर या ठिकाणी आरोपीयांनी बंदुकीतुन दोन गोळया हवेत फायर केल्या म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्यातक्रारी वरुन काशिमिरा पोलीस ठाण्यात दिनांक ३/०६/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन व वरीष्ठ अधिका-यांना गुन्हयाबाबत माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथके तयार करण्यात आली. सदर गुन्हयाचा घटनास्थळी तात्काळ भेटी देऊन तांत्रिक विश्लेषन व गोपनीय बातमीदार यांच्या कडून आरोपींची ओळख पटवून त्यांचा शोध सुरु करण्यात आला. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेतील तपास पथकाने आरोपींचा ठावठिकाणाबाबत माहीती प्राप्त करुन त्या आधारे १) विशाल ऊर्फ गचक्या वेल्दा मुत्तुस्वामी, वय. २० वर्ष, रा. दहिसर पुर्व, मुंबई, २) राहुल ऊर्फ बॉक्सर शिवनाथ विश्वकर्मा, वय. २७ वर्ष, रा. दहिसर पुर्व, मुंबई, ४) अनुराग दिपक म्हात्रे, वय २० वर्षे, रा.मिरारोड पुर्व, ता.जि.ठाणे ५) अभिजीत सुधाकर पाष्टे, वय २८ वर्षे, विरार पुर्व. यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातुन ०१ गावठी बनावटीचे पिस्टल, ०२ मॅग्झीन, ०५ जिवंत काडतुसे तसेच गुन्हा करतांना वापरण्यात आलेली होन्डा कंपनीची आय-२० चार चाकी वाहन जप्त करण्यात आलेले आहे. तसेच गुन्हे शाखा – १ यांचे तपास पथकाने आरोपी विकास ऊर्फ विकी राजु निणानिया, वय. ३० वर्ष, रा. मनवेल पाडा, विरार पुर्व यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून डयुक कंपनीची गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हस्तगत केलेली आहे. अशाप्रकारे २४ तासाच्या आत फायरींगचा गंभीर गुन्हा उघडकीस आलेला आहे.
सदरची कारवाई श्री. डॉ. महेश पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), व श्री. अमोल मांडवे सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पो.नि. राहुल राख , गुन्हे शाखा घटक -१ चे प्रभारी पो.नि.अविराज कु-हाडे, अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पो.नि./देवीदास हांडोरे, सपोनि/दत्तात्रय सरक, नितीन बेंद्रे, अमोल आंबवणे, कैलास टोकले, पुष्पराज सुर्वे, सफौ/पोशिरकर, राजु तांबे, पोहवा/जर्नादन मते, सुरेश राणे, मनोहर तावरे, थापा, गर्जे, गायकवाड, शिवा पाटील, राजविरसिंग संधु, विसपुते, पोना/लांडगे, पोअं/जगताप, प्रविणराज पवार, सुशिल पवार यांनी केलेली आहे.
