मालवणी, मालाड (पश्चिम) येथे राहणाऱ्या श्रीमती. सुनिता गुरव( वय ३०) धंदा- घरकाम या २/११/२०२० रोजी रात्री ९:०० वा भुमी पार्क फेस-५ सोसायटी ऑफिसबाहेर फूटपाथवर पती व तिच्या मुलांसह झोपले होते. मध्यरात्री ३:३० च्या दरम्यान सुनिता गुरव यांना जाग आली तेव्हा त्यांची एक वर्षाची मुलगी बबीता दिसून आली नाही. म्हणून, सुनिता व त्यांच्या पतीसोबत मुलीचा जवळच्या परिसरात शोध घेतला परंतु मुलगी कुठे न सापडल्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कायदेशीर रखवाली तुन पळवून नेले असावे, अशी खात्री सूनिता गुरव यांना झाली. त्यामुळे सुनिता गुरव यांनी चारकोप पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.
सदर गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा व संवेदनशील असल्यामुळे तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पोलीस ठाण्यातील ३ पथकांची नेमणूक करण्यात आली. पथकामार्फत आजूबाजूच्या परिसरात मुलीचा शोध घेण्यात आला. सुनिता गुरव यांची मुलगी बबीता अत्यंत लहान असल्याने आणि बोलू शकत नसल्या कारणाने , हा गुन्हा गुंतागुंती स्वरूपाचा होता. म्हणून घटनास्थळावरील आणि जवळच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यात आली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदार्यांच्या मदतीने अवघ्या २ तासात अपर्हीत १ वर्षाची बबीता अंधेरी परिसरातून महिला आरोपीकडून सुखरूप ताब्यात घेण्यात आली.
या गुन्ह्यात सचिन येलवे (वय ४०), सुप्रिया येलवे (वय ३५), रश्मी पवार (वय २९) आणि राजू पवार (वय ३६) यांना ताब्यात घेऊन गु.र.क्र. ८७५/२०२० कलम ३६३ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
सदर होण्याची कारवाई माननीय अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग, श्री. दिलीप सावंत यांच्या आदेशानुसार पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-११) श्री. विलास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.दिलीप यादव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक चारकोप पोलीस ठाणे श्री.विठ्ठल शिंदे , पोलीस निरीक्षक. लांगी, सहाय्यक पोलीस निरीक्षक.वाघमारे , पोलीस उप निरीक्षक. ढेंबरे आणि स्टाफ यांचे विशेष पथक तयार केले होते.
