विरार : दिनांक ०३/०७/२०२१ रोजी ११. २० वा. भुषण हॉस्पिटल समोरील सिग्नल कडून डी – मार्ट कडे जाणाऱ्या रोडवरील लिंकरोड येथील कच्या रोडवर, विरार पूर्व,ता. वसई , जि . पालघर, येथे दोन अनोळखी स्त्रियांनी त्यांचे ताब्यातील सोन्यासारखे दिसणारे मणी जास्त किंमतीचे असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र , कानातील सोन्याचे डुले व ५००रुपये घेवून तसेच फिर्यादी यांच्या हातात त्यांच्याकडील नकली काळपट पडलेली सोन्यासारख्या धातूचे मणी देवुन फसवणूक केली . अशी तक्रार फिर्यादी यांनी विरार पोलीस ठाणे येथे नोंदवली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान तांत्रिक बाबीचा आधार घेवून आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत आणि बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून दोन महिला आरोपी १) गीता रमेश कांग्या वय : ४३ रा. भाव पालीताना , गुजरात २) आशा मंगल सरव्या वय : ३८ रा. ढोलाटींबी, गुजरात अशांना विरार येथुन ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तपासामध्ये त्यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे . तपासादरम्यान सदर आरोपींकडून ५१,०००/- रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुंडे ,पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३ , श्रीमती रेणुका बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस स्टेशनचे वपोनि. श्री. सुरेश वराडे , गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उप निरीक्षक अभिजीत भुपेंद्र टेलर , संदेश राणे, पो.हवा . सचिन लोखंडे , पो.ना. विजय दुबळा , हर्षद चव्हाण , भुषण वाघमारे , संदीप शेरमाळे , पो.शि , सुनील पाटील , इंद्रनील पाटील, विशाल लोहार, रवी वानखेडे, सागर घुगरकर ,पावन पवार यांनी केली आहे.
