दिनांक १३/१०/२०२१ रोजी सकाळी ०९-०० वा.च्या सुमारास भाईदर पोलीस ठाणे हद्दीतील गणेश देवलनगर येथील राहत्या घरातील रुममध्ये चार्जीग करीता लावलेला मोबाईल फोन कोणीतरी चोरी केल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी दुर्गेश प्रेमचंद गुप्ता वय २० वर्ष रा. साईबाबा मंदिराजवळ, मुर्धागाव, भाईंदर प. यास दिनांक १३/१०/२०२१ रोजी गुन्हे शाखा क्रमांक १, मिराभाईंदर, वसई-विरार यांनी शिताफीने ताब्यात घेवुन चौकशी केली असता नमुद आरोपी याने गुन्हयाची कबुली देवून त्याच्या ताब्यातुन चोरी केलेला मोबाईल फोन व इतर ३ चोरी केलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते.
सदर गुन्हयात अटक केलेला आरोपी दुर्गेश प्रेमचंद गुप्ता यास दि.१४/१०/२०२१ रोजी मा. न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडी रिमांड घेवुन भाईंदर पोलीस ठाणे येथे परत येत असतांना नमुद आरोपी हा भाईंदर पश्चिम चेतन वाईन शॉप समोरील रोडवरुन चालत्या गाडीच्या खिडकीतुन पोलीसांच्या ताब्यातुन पळुन गेला होता. या घटने बाबत दि. १४/१०/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपी हा अँनटॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लपून बसल्याची खात्रिशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सापळा लावून त्यास शिताफिने पकडून अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मुगुटलाल बी. पाटील, पोनि. श्री सागर टिळेकर, सपोनि. श्री विश्वास बाबर, श्री विजय नाईक, पो.उपनिरी. श्री किशोरकुमार नेवसे, किरण कदम, श्री अनिल करे, श्री वैभव धनावडे, पो.ना. परदेशी, मुल्ला, पो.शि./ मुंढे, सानप, कनोजे, बोरसे सर्व नेम. भाईंदर पोलीस ठाणे यांनी केली असून पुढिल तपास चालू आहे.
