वालीव : नवजीवन गावदेवी मंदीर टेकडी येथे सद्दाम कुरेशी वय २७ वर्षे, याचा प्रेमभंग झाल्याने नैराश्यापोटी टेकडीवर जावून मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. एस. जयकुमार यांच्या मोबाईल वर फोन रुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले त्याचवेळी पोलीस आयुक्त यांनी आत्महत्या करणा-या मुलाचा मोबाईल नंबर व फोटो याची माहिती मोबाईल फोनद्वारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे वालीव पोलीस ठाणे यांना तात्काळ देवून कोणत्याही परिस्थितीत सदर मुलाचे मन आत्महत्या करण्यापासून परावृत्त करुन त्यास सुरक्षित त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले व.पो.नि. यांनी तात्काळ पेल्हार बीट अधिकारी स.पो.नि. सोपान पाटील यांना तसेच पोलीस ठाणे व्हॉटसअॅप ग्रुपवर आत्महत्या करणा-या मुलाचा फोटो व फोन नंबरबाबत माहिती देवून सदर ठिकाणी जावून आत्महत्या करण्यापासून सदर मुलाचे मन परावृत्त करण्याचे आदेश दिले . सदर आदेश प्राप्त होताच पेल्हार बिटचे स.पो.नि. सोपान पाटील, पो.शि. श्रीकांत पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.शि. सचिन बळीद व पो.शि. बालाजी गायकवाड यांनी क्षणाचाही विलंब न लावता नवजीवन झोपडपट्रटी येथील गावदेवी मंदीर टेकडीवर जावून तेथे आत्महत्या करण्यासाठी गेलेला मुलगा नामे सद्दाम सलीम कुरेशी वय २७ वर्षे यास विश्वासात घेवून त्यास आत्महत्या करण्यापासून त्याचे मन परावृत्त करुन ताब्यात घेतले व पोलीस ठाणे येथे व.पो.नि. वालीव पोलीस ठाणे यांचे समक्ष हजर केले असता व.पो.नि. वालीव पोलीस ठाणे यांनी आत्महत्या करणारा तरुण नामे सद्दाम कुरेशी वय २७ वर्षे यास आत्महत्या करण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, त्याचे त्याच्या मावशीच्या मुलीवर प्रेम होते व तिच्यासोबत त्याचे लग्न ठरले होते. परंतू सदर मुलीने त्यास काहीएक न सांगता दुस-या मुलासोबत लग्न केल्याने त्याचा प्रेमभंग झाला. त्यामुळे तो ब-याच दिवसांपासून नैराश्यामध्ये होता. म्हणून त्याने स्वत:चे जिवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. व.पो.नि. श्री. कैलास बर्वे यांनी सदर मुलास आत्महत्या करण्यापासून त्याचे समुपदेशन करून त्याचे वडील नामे सलीम अब्दुल कुरेशी वय ५४ वर्षे, रा. तवक्कल वेल्फेअर सोसायटी, मालाड (प.), मुंबई यांना पोलीस ठाण्यास बोलावून सदर मुलास त्यांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. एस. जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, स.पो.नि. सोपान पाटील, पो.शि. श्रीकांत पाटील, पो.शि. सचिन बळीद व पो.शि. बालाजी गायकवाड यांनी केलेली आहे.
