नायगाव : प्रियसीचा खुन करून तिची बॉडी बॅगमध्ये भरून आरोपी व त्याची पत्नीने गुजरात राज्यात वेल्हेवाट लावुन पुरावा नष्ट केलेल्या खुनाचा क्लिष्ट गुन्हा उघड करण्यास नायगाव पोलीस ठाणे गुन्हा प्रकटीकरण शाखेस यश.अधिक माहितीनुसार नायगाव पोलीस ठाणे हद्दीत जेबा रामचंद्र महत वय-२२ वर्षे राहणार – रुम नं ३०१, जिवदानी निवास ओस्वालनगरी, विशालनगर, मस्जीद गल्ली नालासोपारा पुर्व याने खबर दिली की, त्याची बहीण नयना रामचंद्र महत वय-२८ वर्षे राहणार- सनटेक सोसायटी नायगाव पुर्व याठिकाणी राहत असुन तिचा दिनांक १४/०८/२०२३ रोजी पासुन फोन लागत नसल्याने तसेच तिच्या राहत्या पत्यावर जावुन पाहिले असता ती मिळुन न आल्याने तिच्या बाबत नातेवाईक, मित्र-मैत्रिण यांच्याकडे चौकशी केली असता काही एक उपयुक्त माहिती न मिळाल्याने ती मिसीग झाल्याबाबत दिनांक १४/०८/२०२३ रोजी तक्रार दिल्याने मिसींग केस दाखल करण्यात आली होती.
सदर हरवलेली मुलगी ही मिळुन येत नसल्याने पोलिसांनी ती राहत असलेल्या बिल्डींगची सीसीटीव्ही फुटेज व गुप्तबातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती च्या आधारे संशयीत इसम मनोहर शुक्ला राहणार- अस्टर बिल्डींग, एव्हरशाईन नालासोपारा पुर्व यास नालासोपारा पुर्व परिसरातुन पोलिसांनी ताब्यात घेतले. व त्यांच्याकडे कौशल्यपुर्ण चौकशी केली असता त्यांनी मुलगी नयना रामचंद्र महत हिचा खुन केला असुन सदर मुलगीचे प्रेत हे पुरावा नष्ट करण्याकरिता आरोपी व त्याची पत्नी पुनम शुक्ला यांनी मिळुन गुजरात येथे टाकले अशी कबुली पोलिसांना दिल्याने सदरबाबत नायगाव पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयामध्ये आरोपी मनोहर शुक्ला व पुनम मनोहर शुक्ला यांना अटक करण्यात आली आहे.
वरील कामगीरी श्रीमती पौणिमा चौगुले पोलीस उप आयुक्त, परीमंडळ २ वसई, श्रीमती. पदमजा बडे, सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग, नायगाव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश भामे,पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सागर टिळेकर, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्री अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, स.पो.नि. गणेश केकान, स. पो. नि. रोशन देवरे, पो.हवा. देविदास पाटील, मुनाफ तडवी, सुनिल पाटील, नवनाथ तारडे, पो. अंम. सचिन मोहीते, सचिन खताळ, जयवंत खंडवी,अमर पवार, चेतन ठाकरे, अशोक पाटील, बाळासाहेब भालेराव यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.
