दादर : दिनांक : २४/०९/२०२१ रोजी मोहमद जहनूड मन्सूर, वय २१ राह. भिवंडी हे सायन ते माटुंगा असा रेल्वेतून प्रवास करीत असतांना त्यांची बॅग व सामान अंदाजे ५०००रु. हे गाडीतच विसरले त्याबाबत त्यांनी माटूंगा रेल्वे स्टेशन वरील पोहवा जारकर यांना सांगितले. त्यानंतर लागलीच पोहवा जारकर यांनी करिरोड रेल्वे स्टेशन वरील सपोफौ इंगळे याना फोन वरून कळवले की सदर गाडी मध्ये वरील नमूद बॅग राहिली आहे. सपोफौ इंगळे, मपोशि डबडे यांनी मोहमद मन्सूर यांची बॅग करिरोड येथे उतरून घेतली व प्रवासी यांना बोलावून खात्री करून बॅग त्यांच्या ताब्यात दिली. बॅग परत मिळाल्याने मोहमद मन्सूर यांनी आभार व्यक्त केले
कल्याण : टिटवाळा येथे राहणारे मंगेश सुरेश शिंदे हे रेल्वे ने प्रवास करीत असतांना त्यांचा मोबाईल फोन किंमत अंदाजे १०,००० रुपये हा प्रवासादरम्यान गहाळ झाला होता याबाबत त्यांनी रीतसर तक्रार नोंदविली होती त्यानुसार कल्याण रेल्वे पोलीस ठाणे माननीय रेल्वे पोलिस आयुक्त सो. यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहिमे अंतर्गत दिनांक २४/०९/२०२१ रोजी त्यांचा गहाळ झालेला मोबाईल वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार सपोफौ कोळी, पोशि दामेधर यांनी मंगेश शिंदे यांना परत दिला आहे त्याबद्दल त्यांनी कल्याण रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे.
पनवेल : माननीय पोलीस आयुक्त सो., लोहमार्ग मुंबई यांचे आदेशा प्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संभाजी कटारे यांचे मार्ग दर्शनाखाली पनवेल रेल्वे पोलीस ठाणे. यांनी प्रवासादरम्यान गहाळ किंवा विसरलेले सामान तक्रारदारांना परत करण्याचे काम केले त्यात सुदर्शन सुधाकर हाटे यांना संपर्क साधून त्यांना त्यांचा मोबाईल फोन शाखा स पो फौ गुजर, म पो शि माळी अंमलदार यांनी ताब्यात दिला . याबाबत प्रवासी यांनी पोलिसांचे आभार मानले.
वसई : दिनांक २४/०९/२०२१ रोजी एक महिला प्रवासी प्रवासादरम्यान आपली बॅग रेल्वेतच विसरून गेली होती गाडी ज्यावेळी विरार रेल्वे स्टेशन येथे आली त्यावेळी ड्युटीवर असणारे PSI कांबळे पो.शि. माने मपोशि,भालेकर यांना गस्त करीत असतांना पांढऱ्या रंगाची बॅग त्यामध्ये २०,००० व १०,००० रु. व इतर बँक चे डॉक्युमेंट अशी मिळून आली सदर बाबत फाईल मध्ये असलेल्या फोन नंबरवर फोन करून महिला प्रवासी यांना विरार रेल्वे पोलीस चौकी येथे बोलावून खात्री करून सर्व कागदपत्रे व बॅग त्यांच्या ताब्यात दिली यासाठी त्यांनी रेल्वे पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले.
