प्रवाशांचे हरवलेले मोबाईल केले परत- रेल्वे पोलिसांची कामगिरी .

Crime News

वडाळा :  रेल्वे प्रवाशांचे हरवले वा चोरीस गेलेले मोबाईल  मा. वरिष्ट अधिकारी सो यांच्या आदेशाने दिनांक २२/०३/२०२२ रोजी   १ )ओवेस इम्तियाज अन्सारी, वय – 22, रा. कुर्ला, यांचा ऍपल कंपनीचा- ८५०००/-रु.  किमतीचा मोबाईल ,२ अलमीराज अख्तर खान, वय – 21, रा. गोवंडी. यांचा  रियल मी कंपनीचा ११८००/-रु. किंमतीचा   मोबाईल फोन,तसेच  ३ ) रेड mi कंपनीचा मोबाईल फोन, किंमत ११५००/-.तक्रारदारांना  त्यांचा मोबाईल फोन परत करण्यात आला आला.मो. फोन परत मिळाल्याने त्यांनी  वडाळा रेल्वे पोलीसांचे आभार मानले आहे.

ठाणे :  चंद्रकांत सखाराम वेलोंडे .रा कळवा ठाणे यांचा १२,९९९/-किंमतीचा हरवलेला मोबाईल दि. २२/०३/२०२२ रोजी ठाणे रेल्वे पोलीस ठाणे  वरिष्ट अधिकारी सो यांच्या आदेशाने परत करण्यात आला. मुद्देमाल परत मिळाल्याने चंद्रकांत वेलोंडे यांनी ठाणे रेल्वे पोलीसांचे आभार मानले आहे.

पनवेल :  महादेव कोयप्पा वाकसे वय ५९ वर्ष यांनी आपला मोबाईल चोरी गेल्याची तक्रार पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथे केली होती. त्यावरून  गुन्हे शाखेचे PSI बदाले आणि पथक यांनी दर चा गुन्हयातील आरोपीला अटक करून गुन्हयातील मुद्देमाल रोख रक्कम ९०००/-रु. हस्तगत केला होता, जास्तीत जास्त मुद्दे मालाची निर्गती करणे बाबत माननीय पोलीस आयुक्त सो, लोहमार्ग मुंबई यांचे आदेशा प्रमाणे तसेच तक्रारदार  यांनी मुद्देमाल किंमत ९०००/-मिळणे बाबत अर्ज केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संभाजी कटारे सो मुद्देमाल शाखा स,पो, फौज मनोज गुजर व ठाणे अंमलदार A,S,I, गंगाधर यांनी तक्रारदार महादेव कोयप्पा वाकसे यांना नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल हा मा. न्यालयात हजर करण्याच्या योग्यत्यां कायदेशीर अटीवर व शर्तीवर त्यांच्या ताब्यात दिला आहे. याबाबत वाकसे यांनी पनवेल रेल्वे पोलिस ठाणे अभिनंदन केले आहे.

 

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 4 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply