कुर्ला : रेल्वे ट्रॅकमध्ये पडलेला मोबाईल शोधून प्रवाश्यास कुर्ला रेल्वे पोलीस यांनी केला परत . दिनांक १९/११/२०२१ रोजी मंजिरी रमेश पार्टे यांचा मोबाईल ठाणे ते घाटकोर प्रवास करताना भांडुप ते कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे ट्रॅक मध्ये पडला होता त्यावेळी ड्युटी वर असणारे ASI खोत भांडुप wpn अहिरे, pc माने यांनी त्यांच्या मोबाईल चा शोध घेऊन सदर मोबाईल त्या महिलेस ओळख पटवून परत केला. मोबाईल परत मिळाल्याने महिलेने रेल्वे पोलिसांचे आभार मानले .
बांद्रा : पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या मुद्देमाल निर्गती विशेष मोहीमे अंतर्गत दिनांक १९/११/२०२१ रोजी वांद्रे रेल्वे ठाणे येथे राधिका राजेंद्र खंडेलवाल, ख्याती विजय गुप्ता , यांचे प्रवासादरम्यान हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल परत करण्यात आले. स.पो.फौ. काटकर व मपोना/झिमन मुद्देमाल अंमलदार यांनी वपोनी. वांद्रे रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मुद्देमालाची निर्गती केली आहे.मोबाइल विनाविलंब परत मिळाल्या बद्दल वरील प्रवासी यांनी मुंबई लोहमार्ग पोलीसांचे आभार मानले आहेत.
ठाणे : दिनांक : १९/११/२०२१ रोजी ठाणे रेल्वे पोलीस यांनीं प्रियांका प्रभाकर टिवरे, संजू नामदेव पंडीत यांचे चोरीस गेलेले मोबाईल वरिष्ट अधिकारी सो यांच्या आदेशाने पो. नि एन.जी खडकीकर, यांच्या मार्गदर्शना नुसार प्रवासी यांना परत करण्यात आले आहे. आपले फोने परत मिळाल्याने प्रवासी यांनी ठाणे रेल्वे पोलीसांचे आभार मानले आहे.
