मीरा भाईंदर , व वसई विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मान्सून कालावधीत मोठया संख्येने पर्यटक हे तलाव, धबधबे , धरणे, व समुद्र किनारी पर्यटना साठी येत असतात . त्याठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडत असतात . सध्या च्या कोव्हिड च्या परिस्थिती चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पावसाळ्यात पर्यटकांची पर्यटनासाठी होणारी गर्दी पाहता व सामाजिक अंतर राखले न गेल्यास तेथे कोव्हीड -१९ चा संसर्ग व प्रादुर्भाव वाढण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. त्याठिकाणी पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहावी व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे गरजेचे होते. त्याकरिता श्री. विजयकांत सागर, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) यांनी प्रक्रिया संहिते नुसार पर्यटन स्थळाच्या १ की . मी. परिसरात दिनांक २२. ०६. २०२१ पासून ते १८. ८. २०२१ पर्यंत खालील बाबीकरिता प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत .
१. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे , खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे .
२. धबधब्याच्या उगम स्थानी जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसने.
३. पावसामुळे धोका दायक झालेली ठिकाणे , धबधबे , दऱ्यांचे कठडे ,धोकादायक वळणे इ . ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे .
४. पावसामुळे निर्माण झालेले नैसर्गिक धबधब्यांचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधूंद अवस्थेत प्रवेश करणे ,मद्य बाळगणे , मद्य वाहतूक करणे , अनधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे .
५. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे .
६. वाहन अति वेगाने चालविणे तसेच वाहतुकीस परिणाम होईल अशा प्रकारे वाहन चालविणे .
७. वाहनांची ने -आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे .
८. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ , कचरा , काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या ,उघड्यावर इतरत्र फेकणे .
१०. ज्या कृतीमुळे ध्वनी ,वायू, व जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे. ९. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे , टिंगलटवाळी ,शेरेबाजी करणे,या असभ्य हावभाव करणे होईल कोणतेही वर्तन करणे .
११.. सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे , डी . जे. सिस्टिम वाजविणे , गाडीमधील स्किपर वाजवणे व त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे.
सदर आदेशाचा कालावधी हा दिनांक २२.०६. २०२१ रोजीचे दिनांक ००. ०१ ते १८. ८ . २०२१ रोजीचे २४. ०० व. पर्यंत लागू राहतील .
