दिनांक ०२/१०/२०२१ रोजी मा. पोलीस आयुक्त श्री. सदानंद दाते यांचे उपस्थितीत महिला पोलीस अमंलदार श्रीमती ठाकरे यांचे हस्ते आचोळे पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. तुळींज पोलीस ठाणे हद्दितील वाढती लोकसंख्या व त्यामुळे वाढलेल्या गुन्हेगारीचे प्रमाण नियत्रंणात आणण्याच्या दृष्टीने नवीन पोलीस ठाण्याची निर्मीती करणे आवश्यक झाले होते. सदर बाबींची आवश्यकता लक्षात घेवून मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय या आठवडयामध्ये दोन नवीन पोलीस ठाण्यांचे उद्घाटन करण्याचे नियोजीत केले असून दिनांक ०२/१०/२०२१ रोजी तुळींज पोलीस ठाणे कार्यक्षेत्राचे विभाजन करून आचोळे या नवीन पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. नवीन पोलीस ठाण्याची निर्मीती झाल्याने सदर भागामध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण येवून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण नक्कीच वाढणार आहे. आचोळे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सरोदे यांची नेमणूक करण्यात आलेली असून आचोळे पोलीस ठाणेचा संपर्क क्रमांक २५०-२९९०९५५ असा आहे.
सदर पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री सदानंद दाते, मा. अपर पोलीस आयुक्त श्री एस. जयकुमार, मा. पोलीस उपआयुक्त डॉ. श्री महेश पाटील, श्री विजयकांत सागर, श्री संजयकुमार पाटील, श्री प्रशांत वाघुडे व इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.
