वरिष्टांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई येथील काठीयावाड या हॉटेल जवळ फिर्यादी हे कोविड साथीच्या अनुषंगाने कोविड साहित्य खरेदी करण्याकरीता आले असता. एका पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीमधून आलेल्या इसमा पैकी तीन साध्या वेषातील व दोन खाकी गणवेश धारण केलेल्या लोकांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेअर हाऊसला घेवुन जाण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये जबरदस्ती बसवुन वेअर हाऊस येथे न नेता त्यांना गाडी मध्ये शिवीगाळी करून बोलण्यात गुंतवुन गाडीमध्ये असलेल्या लाकडी दांडके व ठोश्याबुक्याने मारहाण करून जबरदस्तीने फिर्यादी यांचे जवळील २५००,००००/- रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल दरोडा टाकुन घेवुन गेले बाबत फिर्यादी वय २७ वर्ष, रा. मुंबई यांनी दिलेल्या तक्रार वालीव पोलीस ठाणे येथे दाखल केली त्यावरून वालीव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 1 २२३/२०२१ भां.द.वि.स.कलम- ३९५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात करण्यात आला.
सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष-३ विरार पथकानी तांत्रीक व गुप्त बातमीदार गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत यांचा सखोल व कौशल्यपुर्वक तपास करुन सदर गुन्हयामध्ये आरोपी निष्पन्न करुन आरोपी १) पार्थ जातिन्द्र जानी, वय- २६ वर्षे, २) रब्बानी मेहबुब परेल, वय-२८ वर्ष, ३) अब्दुल हमिद अहमद सैय्यद, वय-३५ वर्षे, ४) गिरीश श्रीचंद वालेचा ऊर्फ मनोहरलाल पटेल, वय २७ वर्षे, ५) इम्रान अहमद शेय, वय-३८ वर्ष, ६) स्मितेश सुभाष गवस, वय ३७ वर्षे. ७) सुरेश गुणाजी दळवी, वय-३३ वर्षे, ८) संतोष गोविंद मोरे, वय-४६ वर्षे, ९) विनय संतोष सिंग, वय ४१ वर्षे, सर्व रा. ठाणे यांना ताब्यात घेवुन अटक करण्यात आली.
सदर गुन्हयाचा अधिक तपास वालीव पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी श्री. डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि/प्रमोद बडाख, सपोनि/ संतोष गुर्जर, सपोनि/ कुटे, पो.उपनिरी/ शिवाजी खाडे, पोउपनिरी/ हितेंद्र विचारे, सफो/ अनिल वेळे, आणि पथक यांनी केली आहे.
