शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक. १९/१२/२०२० रोजी सुमारास ५:०० च्या दरम्यान अर्हम ज्वेलर्स ६० फुट रोड, धारावी मुंबई येथे सशस्त्र दरोडा घालण्याच्या इराद्याने स्वतःच्या कब्जात विनापरवाना देशी बनावटीच्या गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, दोन चोपर एक स्टीलचे पाते असलेली तलवार, दोरखंड, मिरची पावडर, दोन मोटारसायकल वापरून आरोपी नामक १)अन्वर हुसाइन मोईनुद्दिन शेख (वय-३४) राहायला.सेनापती बापट मार्ग माहीम स्टेशन समोर माहीम २) बाबू रामलु मदिना (वय-३४) राहायला. माहीम रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म माहीम ३) अमित लक्ष्मण शिंदे (वय-३२) राहायला. माहीम फाटक फूटपाथवर माहीम ४) अनिल कुमार उर्फ जॉनी राम तीरस जातप (वय-३२) राहायला. गप्पू भंगार काट्या जवळ माहीम फाटक (पूर्व) या चार आरोपींनी दरोडा घातला.
सदर गुन्ह्या विरोधात दिनांक. १९/१२/२०२० रोजी गु.र.रजि. ३८५/२०२०, ३९९, ४०२ आय.पी.सी सह ३,४,२५,२७ सह भारतीय हत्यार कायदा सह १२४ म.पो. का सह ४१ डी सी.आर.पी.सी एक्ट नुसार तक्रार दाखल करण्यात आली.
त्यावरून शाहूनगर पोलीस ठाणे यांनी तांत्रिक करून माहितीच्या आधारे आरोपींचा तपास करून गुन्ह्या वापरण्यात आलेली हत्यारे आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी डीसीबी प्रणय अशोक डीसीपी कक्ष-५ , एसीपी धोपावकर, पी. एस. आय. कदम , पी.एस.आय. पालवे, पी.एस.आय. धोरे आणि पथक यांनी केली
