सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.२३/०२/२०२० रोजी सकाळी ०९-३० वाजता सुमारास नागरीक श्री. गजानन अनंत मेहेर यांनी १०० नंबरवर मिरा-भायंदर, वसई विरार नियंत्रण कक्ष येथे कळवीले की, एक वयोवृध्द महिला. (आजी) नवापुर नाका या ठिकाणी असुन, तिचे नातेवाईकांबाबत काहीएक माहिती सांगत नाही.
सदर माहिती नियंत्रण कक्ष कडूण पोलीस ठाणे अर्नाळा येथे प्राप्त झाल्या बरोबर तात्काळ सदर ठिकाणाची दखल घेवुन पोलीस ठाणे अर्नाळाचे सपोनि/बी.बी. मुसळे, चालक पाटील यांनी तिथे जावुन वयोवृध्द महिला (आजी) यांना पोलीस ठाण्यात आणुन विचारपुस केली. त्यांचे नांव सुभद्रा अर्जुन म्हस्के, वय ६५ वर्षे असे सांगीतले परंतु त्यांना वास्तव्या बाबत काही माहिती सांगता येत नव्हती. त्यांचे नातेवाईकांचे शोध घेणे कामी त्या वृध्द महिलेचा फोटो व्हॉटसअॅप ग्रुपवर प्रसारीत केले. व्हॉटसअॅप च्या माध्यमातुन नातेवाईकांचा शोध लागुन त्या श्रीमती कविता जगदिश थोपटे, सुभाष लेन काळयाचा पाडा अर्नाळा यांची आई असल्याचे निष्पन्न झाल्याने खात्री करुन आजीला त्यांच्या मुलीच्या ताब्यात दिले.
या बाबत सदर आजीचे मुलीने पोलीसांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
सदरची कामगिरी अर्नाळा पोलीस ठाणेचे सपोनि/बी.बी.मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोउनि/तुषार माळोटे, सफौ/गहिले, पोहवा/अवतार आणि पथक यांनी केलेली आहे
