दिनांक ६-५-२०२१ रोजी फिर्यादी कोलते यांच्या राहत्या घरी आरोपी नवा : १) सोमेश नवनाथ म्हात्रे २) साहिल श्रीनिवास ठाकूर उर्फ वाल वालट्या हे फिर्यादी यांच्या घराबाहेर चकरा मारत असताना दिसला थोड्या वेळाने आरोपीने कोलते यांच्या घराचा दरवाजा ठोठावत होता / कोलते यांनीं आरोपीस दरवाजा ठोठावू नका असे सांगितल्यास दोन्ही आरोपीना राग आला, व आरोपी क्र. ०१ याने रागाच्या भरात कोलते यांस शिवीगाळ करून त्यांच्या डोळ्यावर हाताचे ठोशे मारले . व कोलते यांना मारण्याची धमकी देत त्यांचे गळ्यावर उजव्या बाजूला चाकूने वर करून दुखापत केली तसेच आरोपी साहिल याने लाकडी बांबूने पाठीवर व डोक्यावर मारून दुखापत केली. कोलते यांनी सदर गुन्ह्यांची तक्रार विष्णूनगर पोलीस स्टेशन येथे दाखल केली असता आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यांचा तपास हा विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि. गणेश वडणे व पथक यांनी गुप्त बातमीदारा मार्फत आरोपी यांची जागा सतत बदलत असून देखील त्यांनी आरोपी यांचा शोध घेतला आरोपी नाव : ०१)सोमेश नवनाथ म्हात्रे वय : २५ रा. डोंबिवली पश्चिम २ ) साहिल श्रीनिवास ठाकूर उर्फ वालट्या वय 22 रा. डोंबिवली पश्चिम यांना मोठागाव ,शंकर मंदिराच्या मागे,रेतीबंदर रोड येथे पकडुन दिनांक ०५/०८/२०२१ रोजी अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी मा.सहायक पोलीस आयुक्त,सो.डोंबिवली विभाग, डोंबिवली श्री.जयराम मोरे सो.डोंबिवली विभाग व मा. वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. संजय साबळे यांचेमार्गदर्शनाखाली सपोनि. जी.आर. वडणे,पोहवा.एस.एन.नाईकरे, पोना.एस.के.कुरणे, पोना.बी.के.सांगळे,पोशि.के.अे.भामरे,पोशि.एम.एस.बडगुजर, यांनी सदरची कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे.
