दिनांक १७/०९/२०२१ रोजी सराईत गुन्हेगार झवान खुर्शिद हसन सय्यद उर्फ टर्रो वय : २१ वर्षे, रा: जोगेश्वरी (पुर्व) यांस ३०,०००/- रु. किमतीचे सोने व इतर मालमत्ता चोरी केलेल्या आरोपासाठी अटक करण्यात आली होती त्याचदिवशी आरोपीस मा. न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली . गुन्हयातील चोरीस गेलेली संपुर्ण मालमत्ता आरोपी कडून हस्तगत करण्यात आली त्यानंतर दिनांक २०/०९/२०२१ रोजी त्यास मा.न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यास आर्थर रोड, मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथे ठेवण्यात आले . त्यानंतर आरोपी रिझवान सय्यद याने त्याची प्रकृती बिघडल्याचे नाटक केले व आर्थर रोड कारागृहातील संबधीत अधिकारी यांचेकडे औषधोपचाराची मागणी केल्याने त्यास दिनांक २४/०९/२०२१ रोजी रात्रौ ०१:३० वाजता सर.जे.जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . आरोपीस सकाळी ०८. ३० वाजता त्यांची तपासणी करण्यासाठी अंतरंग रोगी विभागात घेऊन जात असताना तो रुग्णालयातून पळून गेला त्यामुळे त्याचा विरुद्ध सर.जे.जे मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर घटनेची माहिती घवाडी पोलीस ठाणे यांना समजताच त्यांनी त्याचा शोध घेत असतांना सी.सी.टी.व्ही फुटेज द्वारे समजले कि आरोपी हा सदर ठिकाणावरुन टॅक्सीमध्ये बसून फरार झाल्याचे समजले त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार आरोपी हा रेल्वेने अजमेर, राज्य- राजस्थान येथे पळुन जाणार आहे असले समजले .त्यानंतर तांत्रिक तपास करुन आरोपीच्या नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्यावरुन टॉवर लोकेशन व सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे महाराज भवन, जोगेश्वरी (पुर्व) मुंबई या परिसरातुन मेघवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने सापळा रचुन आरोपीस ताब्यात घेतले आले असून त्यास पुढील कार्यवाही साठी सर. जे. जे मार्ग पोलीस ठाणे यांच्याकडे सुपुर्त करण्याची तजविज करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप आयुक्त, डॉ. महेश्वर रेडडी, परि–१०, मुंबई तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, मेघवाडी विभाग, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली मेघवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजीव पिंपळे व पथकातील सपोनि चौगले, सपोनि शिंदे, पोशिक.पाटील, पोशिक. सोनावणे, पोशिक. वरठा, पोशिक. शेख, पोशिक. बांगर,यांनी केली.
