वसई : पेल्हार पोलीस ठाण्यातील हद्दीत कठीयावाड हॉटेल च्या समोर शगफ निसार लोणबाल, वय-३२ वर्षे यांनी आपली महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप हि गाडी उभी ठेवलेली होती ती दिनांक १०/११/२०२१ रोजी कुणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करुन नेली याची तक्रार दिली त्यावरून अज्ञात आरोपीवर पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्हयाच्या अनुषंगाने पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाची तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदार यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी १) सरवर फतेह मोहम्मद खान यास दि. १६/११/२०२१ रोजी अटक करुन त्याच्याकडून मिळालेल्या माहितीचे आधारे त्याचा साथीदार २) वासिफ साबिर अली यास प्रतापगड, उत्तरप्रदेश येथुन ताब्यात घेवुन अटक केली आहे. नमुद अटक आरोपी कडून गुन्हयातील चोरीस गेलेली महेंद्रा बोलेरो पिकअप कंपनीची कार तसेच गुन्हा करते वेळी वापरत असलेली मारुती सुझुकी कंपनीची स्विप्ट कार असा एकुण- २,९६,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे . तसेच नमुद आरोपी यांनी वालीव पोलीस ठाण्यात दाखल असेलेला गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींवर अजून मुंबई शहर, उत्तरप्रदेश, छत्तीसगड येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, श्री. महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पो.उप.नि/ सनिल पाटील, पोहवा टी. जी. माने, पो.ना. टी. एस. चव्हाण, प्रताप पाचुंदे, नामदेव ढोणे, पो. अं. संदिप शेळके, सचिन बळीद, रोशन पुरकर, बी. एस .गायकवाड, किरण आव्हाड, मोहसिन दिवाण, यांनी केली आहे.
