पुरातन पंचधातूंची चोरी करणाऱ्या आरोपींना विरार पोलीसांनी केले गजाआड

Crime News

विरार (पश्चिम) येथील शंभूनाथ जैन मंदिर येथे ५० वर्षापेक्षा पुरातन पंचधातूच्या १,६८,०००/- रुपये किंमतीच्या मुर्त्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्या बाबत विरार पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १०५६/२०२० भादविस कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची घटना दिनांक. १५/१२/२०२० ते दिनांक. १६/१२/२०२० च्या दरम्यान घडली.

गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा विरार कक्ष-३चे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बडाक व पथकाने तांत्रिक तपास करुन तसेच माहिती प्राप्त करून आरोपी १) वय- २०, राहायला विरार (पूर्व) २)वय-३६, राहायला. विरार (पश्चिम) ३)वय-२८, राहायला. विरार (पूर्व) ४) वय-२२, राहायला. विरार (पश्चिम) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कौशल्यपूर्ण तपास करून मंदिर चोरीच्या मुर्त्या व पूजेचे साहित्य तसेच चोरीचा माल विकत घेणारे १) वय- ४२, राहायला. खारोडी नाका विरार (पश्चिम) २)वय-४७, राहायला जकात नाका जवळ विरार (पश्चिम) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील पुरातन पंचधातूच्या मुर्त्या १,६८,०००/- रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला.

सदर आरोपींचा या गुन्ह्या व्यतिरिक्त विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५९६/२०२० भादविसं. कलम ३८० व अर्नाळा सागरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३७८/२०२० भादविस कलम ४५७,३८० या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करण्यासाठी विरार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले व पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. विजयकांत सागर, पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, विरार कक्ष-३ चे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बडाख , पोलीस हवालदार अशोक पाटील, पोलीस ना. प्रदीप टक्के, पोलीस ना. मनोज चव्हाण यांनी केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply