पालघर : दिनांक १२.१०. २०२० रोजी रात्री १२. ०५ वाजता सुमारास फिर्यादी वय :३८ , ह्या तारापूर के.पी नगर येथे स्वतःच्या दुकानात असताना एक आरोपी नाईटी घेण्याच्या बहाण्याने दुकानात शिरून फिर्यादीच्या गळ्यातील १०ग्रॅम वजनाची २५,०००/- रुपये किमतीची सोन्याची चैन जबरीने खेचून चोरून आपल्या दुसऱ्या साथीदारांबरोबर ज्युपिटर स्कुटरवर पळून गेले . या घटनेची तक्रार फिर्यादीने तारापूर पोलीस ठाणे येथे नोंदविलीतसेच दिनांक १६.१०. २०२० रोजी ४. ३० वाजेच्या सुमारास फिर्यादी वय : ५२ ह्या घरासमोर वडापाव विकत असताना यातील आरोपी वडापाव घेण्याच्या निमित्ताने येऊन त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे रुपये ३२,०००/- सोन्याचे मंगळसूत्र चोरून साथीदारांसह मोटार सायकल वर बसून पळून गेले . या दोन्ही तक्रारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . नमूद गुन्हयाचा तपास सुरु असताना सदरचा गुन्हा टोळी प्रमुख आरोपी प्रशांत उर्फ राहुल पासवान वय : २४ रा. कोळगाव पालघर , व त्याचे इतर २ टोळी सदस्य यांनी केल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यातील एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा बोईसर युनिटचे पोलीस उप निरीक्षक श्री. आशिष पाटील व अंमलदार यांनी आरोपीस त्याचा मूळ राहत्या घरी मलाठी , राज्य बिहार येथून अटक केली . पालघर जिल्ह्यातील बोईसर, पालघर ,मनोर , विरार, वालीव , डहाणू , तारापूर , वाडा या पोलीस स्टेशन मध्ये शस्त्रांचा धाक दाखवून व मारहाण करून जबरी चोरी , वाहन चोरी ,गंभीर दुखापती करणे अश्या प्रकारचे टोळी प्रमुख प्रशांत उर्फ राहुल पासवान याचे विरुद्ध ११ व टोळीचा सदस्य क्र . २ याच्याविरुद्ध १९ असे गंभीर गुन्हे दाखल आहेत .
सन २०१८ मध्ये सदर गुन्हेगारीचा टोळी प्रमुख प्रमुख प्रशांत उर्फ राहुल पासवान यास मा. सत्र न्यायालय पालघर यांनी एका जबरीचोरीच्या गुन्ह्यात सात वर्ष शिक्षा व १५०० दंड व दंड न भरल्यास ३ महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे .
नमूद संघटित गुन्हेगारी टोळीकडून व नमूद गुन्ह्या व्यतिरिक्त २ चैन स्नॅचिंग , १ जबरीचोरी व ९ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत .
सदरची कामगिरी श्री. दत्तात्रय शिंदे , पोलीस अधीक्षक , पालघर , यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विश्वास वळवी , उप विभागीय पोलीस अधिकारी ,बोईसर विभाग , सपोनि जाधव , तारापूर पोलीस ठाणे, पोउनि आशिष पाटील, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.
