विरार : परराज्यातुन विक्रीकरीता आणलेला २०.०८० किलोग्रॅम वजनाचा ४,१४,९८०/- रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बाळगणा-या आरोपीवर मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई.अधिक माहितीनुसार वसई-विरार, नालासोपारा परिसरात सकाळच्या वेळेस परराज्यातुन आणलेल्या अंमली पदार्थांची खरेदी विक्री होत असल्याने अंमली पदार्थांची खरेदी विक्री करणा-या इसमां विरुध्द माहिती प्राप्त करुन कारवाई करण्याचे आदेश व मागदर्शन व वरिष्ठांनी पोलीस पथकास केले होते.
त्यानुसार दिनांक १३/०९/२०२३ रोजी मध्यवर्ती गुन्हे शाखेतील सपोनि नितीन बेंद्रे व स्टाफ हे विरार परिसरात गस्त करीत असताना विरार रेल्वे स्टेशन पश्चिमेस विरार बस डेपोकडे जाणा-या गावठाण रोडवर गस्त करत आले असताना रस्त्यावर एक इसम पाठीवर दोन सँगबॅगसह संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे दिसले. त्यामुळे पोलिसांना त्याच्या हालचालीवर संशय आल्याने सापळा रचुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यातील इसमास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष रतन सिंग वय ४५ वर्षे, रा. रुम नं. ११, प्लॉट नं ११२५, सिध्देश्वर को. ऑ.हौ. सोसायटी, सेक्टर २,सेंट रॉक शाळेजवळ, गोराई, मुंबई असे सांगितले. याबाबत पोलिसांनी आपल्या वरीष्ठांना कळविल्यानंतर सदर इसमाची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता पाठीवर असलेल्या दोन सँगबॅगमध्ये २०.०८० किलोग्रॅम वजनाचा कॅनाबीस या वनस्पतीची शेंडे म्हणजे गांजा विक्री करीता आणलेला मिळुन आला असुन सदर अंमली पदार्थ पुढील कारवाई करता जप्त करण्यात आला आहे. वर नमुद आरोपी विरुध्द पो. हवा. अनिल नागरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन विरार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास विरार पोलीस ठाणे करीत आहे.
सदरचा आरोपी हा पोलीस रेकार्ड वरील तडिपार गुन्हेगार असुन त्याच्या विरुध्द यापुर्वी – विजयवाडा पो.स्टे. आंध्रप्रदेश राज्य, विजयवाडा पो.स्टे. बोरीवली पो.स्टे. (एकूण ०६ गुन्हे ), कळवा पो. स्टे. असे एकूण १० गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), व श्री. अमोल मांडवे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पो.नि.राहुल राख, स.पो.नि. नितीन बेंद्रे , दत्तात्रय सरक, स.फौ. श्रीमंत जेधे, पो. हवा. शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, प्रविणराज पवार सतिश जगताप, अनिल नागरे, पो. अं. हनुमंत सुर्यवंशी व सफौ संतोष चव्हाण यांनी केलेली आहे.
