नालासोपारा : दिनांक १०/१०/२०२१ रोजी नालासोपारा येथे राहणाऱ्या कुमारी रुपा अशोक यादव यांच्या घरी तिचे सावत्र वडील अशोक यादव यांनी त्यांच्या घरी येवुन खर्चासाठी पैशांची मागणी केली तसेच त्यांच्या बरोबर राहण्याची विचारणा केली असता रूपा यादव व तिची आई निलू यादव यांनी नकार दिल्याने अशोक यादव यास राग आला व त्याने आपल्या पत्नीला शिवीगाळ करून त्याच्या जवळील धारधार चाकुने वार करुन गंभीर जखमी केले होते. त्यावेळी रुपा यादव हया भांडण सोडविण्यासाठी आली असतांना आरोपी अशोक यादव याने तिच्याही पोटावर चाकुने वार करुन तिला देखील गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. सदर घटनेबाबत नालासोपारा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी अशोक पतीराम यादव, वय ६० वर्षे, हा गुन्हा दाखल झाल्या पासून फरार झालेला होता.
त्यामुळे आरोपीचा शोध घेवुन त्यास अटक करण्यासाठी वरिष्ठांनी पोलिसांना आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे नालासोपारा पोलीस ठाण्याचे श्री. विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राहुल सोनावणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी तपास पथक तयार करुन आरोपीचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीनुसार व तांत्रिक तपास करुन फरार आरोपी यास मालाड परिसरातून दिनांक २२/१२/२०२१ रोजी ताब्यात घेवून नमुद गुन्हयात अटक केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक किशोर माने हे करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, श्री. चंद्रकांत जाधव, सहा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली नालासोपारा पोलीस ठाण्याचे वपोनि श्री. विलास सुपे, पोनि. राहुल सोनावणे, सपोनि. अमोल तळेकर, सपोनि. पंडीत मस्के, परि.पो.उपनिरी. सलीम शेख, पोना. किशोर धनु, आदीनाथ कदम, सचिन कांबळे, पोशि सचिन मोहीते, हरेश काळे, राजेश नाटुळकर, नामदेव ढोणे यांनी केलेली आहे.
