प्रतिनिधी : पंजाब सरकारने गट C आणि D पदांच्या भरतीसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना किमान 50 टक्के गुणांसह पंजाबी भाषा परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. अधिकृत निवेदनानुसार, हे पाऊल पंजाबी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा निर्णय घेतला.त्यांच्या म्हणण्यानुसार मायबोली पंजाबी हि संपूर्ण दुनियेत आमची ओळख बनली पाहिजे,आणि पंजाबी जनतेला खुश करणे हा आमच्या सरकारचा मुख्य उद्देश आहे असे हि त्यांनी सांगितले आहे.
हे पाहता महाराष्ट्रात मात्र मराठी भाषिकांना तोंडघशी पडावे लागते. मराठी असून देखील महाराष्ट्रात मराठी माणसाला कोणी वालीच राहिला नाही जो तो आपले स्वार्थ पाहून मराठी माणसाचा फक्त उपयोग करून घेत आहे हेच दिसत आले आहे. गुजरात राज्यात गुजराती अनिवार्य आहे, राजस्थान मध्ये राजस्थानी , तामिळनाडू मध्ये तामिळ भाषा , यूपी आणि बिहार मध्ये त्यांची स्थानिक भाषा असून तसेच कर्नाटक मध्ये देखील कन्नड भाषेस पप्राधान्य देण्यात आले आहे. असे असून हि महराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची असावी असे जर मराठी भाषिकांनी मागणी केली तर महाराष्ट्र हा सर्वांचा असून इकडे एकात्मतेची ढाल पुढे करून मराठी भाषिकांचे तोंड बंद का केले जाते .
