सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २४/०४/२०१९ पासुन फिर्यादी वय २७ वर्ष, रा. शांतीनगर, मिरारोड पुर्व यांस आरोपीत इसम धिरज झा, वय ३० वर्ष, रा. पुनम गार्डन जवळ, मिरा रोड पुर्व याने दुबई येथे शिपींगची नोकरी
लावुन देतो असे आमीश दाखवुन फिर्यादी कडूण १,४५,०००/- रुपये घेतले.
त्याकरीता खोटे कागदपत्र तयार करुन तसेच फिर्यादी यांनी कोवीड-१९ टेस्ट करीता सॅम्पल दिले नसतांनाही फिर्यादीचे नावाचे कोवीड-१९ चे खोटे रिपोर्ट तयार करुन फिर्यादीस जॉब लावुन दिला नाही किवा पैसेही परत केले नाही व
फिर्यादीची फसवनुक केली म्हणुन फिर्यादीचे तक्रारी वरुन आरोपी विरुध्द नयानगर पोलीस ठाणे येथेगु.र.नं. ७५/२०२१ भा.द.वि. कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपीस अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा तपास नयानगर पोलीस करीत आहेत. नागरीकांनी अशा कोनत्याही खोटया आमीशाला बळी पडू नये असे मिरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.
