दिनांक. ३०/१२/२०२० रोजी श्री. संजय कुमार पाटील, पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, नालासोपारा, पोलीस निरीक्षक. शेट्टे, पोलीस ठाणे, अर्नाळा यांच्या मार्गदर्शनात अर्नाळा पोलीसांनी ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने बीच वरील हॉटेलची विशेष तपासणी करून राजोळी सागरी बीच येथील १)हॉटेल सी.व्ही. धाबा व २) हॉटेल हायलाईट येथे शासनाने कोवीड-१९च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करून कोवीड-१९ आजाराबाबत कोणतीही दक्षता न बाळगता हॉटेलमध्ये विनापरवाना दारू पिताना मिळून आले म्हणून, हॉटेल चालक/मालक व दारूचे सेवन करणारे एकूण १७ आरोपीविरुद्ध अर्नाळा पोलीस ठाणे येथे भादंवि कलम१८८, २६९,२७० सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(ब)सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६(ब) अन्वये वेगवेगळे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
