वसई : दिनांक : १/०३/२०१९ रोजी सुमारे १०. ३० वाजेच्या पूर्वी नालासोपारा पूर्व यशवंत एम्पायर बिल्डींगचे ए विंग समोर मोकळ्या जागेत झाडाखाली मयत श्रीमती योगिता मनोज देवरे हिस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून ओढणीने गळा आवळून जीवे ठार मारून तिचे प्रेत तिथेच टाकून पळून गेले अशी तक्रार दिनांक १/०३/२०१९ रोजी नाव : मनीष भिकू बामनीया वय : ३१ रा. वसई गाव यांनी केली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तुळींज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमूद गुन्ह्यातील यापूर्वी ५ आरोपीना अटक करण्यात आले होते परंतु सदर गुन्ह्यात सक्रिय सहभाग असलेला आरोपी नाव :कार्तिक प्रदीप सिंग वय : २३ नालासोपारा पूर्व हा गुन्हा घडल्यापासुन आपले अस्तित्व लपवुन होता. नमुद आरोपी याची माहिती मिळण्याकरिता वारंवार पाठपुरावा करून बातमीदारांमार्फत गोपनीय माहिती काढून आरोपी कार्तिक सिंग यास प्रतापपुर जि . चंदोली उत्तरप्रदेश येथुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले असुन त्यास दिनांक २४/०७/२०२१ रोजी मा. वसई न्यायालयात हजर केले असता दिनांक २९/०७/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असुन पुढील तपास तुळींज पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील ,पोलीस उप आयुक्त (गुन्हे) , श्री. रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष ३ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पो.उप. निरी. उमेश भागवत, पो.ना. मनोज सकपाळ, पो.ना. मुकेश तटकरे यांनी कौशल्यपूर्वक पार पाडली आहे.
