वालीव : खून करून भारत देशातून पळुन जाणाऱ्या ०६ नायजेरिन आरोपींना महाराष्ट्र व मेघालय पोलीसानी संयुक्त कारवाई करून २४ तासाच्या आत अटक केली . मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ४/५/२०२२ रोजी वालिव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगाव पुर्व येथील एका बंद फ्लॅटच्या मास्टर बेडरुमच्या बाथरुम मध्ये एका ५० वर्षीय नायजेरीयन नागरीकाचा नग्न अवस्थेत मृतदेह मिळून आल्याने दिनांक ५/५/२०२२ रोजी वालीव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती सदर प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता मयत इसमास काही नायजेरीयन नागरिकांनी दिनांक ३/५/२०२२ रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या घरातून नालासोपारा पुर्व येथुन जबरदस्तीने काढून त्याला मारहाण करून त्यांच्या टोयाटो या कार मध्ये घेऊन गेल्याचे पोलिसांना दिसून आले तसेच आजूबाजूला चौकशी केली असता त्यांनी हि हीच हकीकत पोलिसांना सांगितली तसेच मयत इसमाबरोबर राहणारे त्याचे तीन साथीदार हे घर सोडून गेल्याचे समजल्याने पोलीसांचा संशय बळावला. दरम्यान मृतक याच्या वैद्यकीय तपासणी दरम्यान यातील मृतक यास कठोरहत्याराने मारहाण झाल्याने त्यास शरीरातील विविध अवयवांना अंतगंत जखमा होवुन, तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी अभिप्राय दिला होता.
त्यावरून मयत यास ०६ नायजेरीयन नागरिकांनी त्याचे राहते घरातून घराबाहेर काढून त्यास मारहाण करून जबरदस्तीने वाहनात बसवून त्याला पळवून नेवून नायगाव येथे नमुद फलंट मध्ये त्यास कठोर हत्याराने ज मारहाण करून जिवेठार मारले व पोलीसांचो दिशाभुल करण्यासाठो त्याच्या अंगावरील कपडे काढुन नग्न अवस्थेत त्याला बाथरूम मध्ये ठेवून रूमचा दरवाजा बंद करून पळून गेल्याचे निष्पन्न झाल्याने अकस्मात मृत्युचे तपास अधिकारी सपोनि संतोष सांगवीकर यांनी दिलेल्या फिर्यादोवरुन वालीव पालोस ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्हयातील आरोपीत हे बँगलोर येथे पळून गेल्याची गोपनिय माहिती पोलिसांना प्राप्त झाल्याने पोलीस पथक बेंगलोर येथे रवाना झालो होती. परंतु त्यादरम्यान नायजेरीयन आरोपो हे बंगलोर येथून विमानाने गुवाहाटी येथे गेल्याचे समजले. सदरचे आरोपी हे हवाई मार्गे देश सोडुन जावु नयेत याकरिता लोकल पोलीस सेलला त्यांची माहिती पुरवून त्याना भारत देश सोडुन पळून जाण्यास प्रतिबंध करण्याकरीता रिपोर्ट देण्यात आला होता आरोपो हे गुवाहाटोयेरपृंजी – शिलॉगडावकी मार्गे बांग्लादेश येथे पळून जाण्याच्या तयारी असल्याचो माहिती पोलिसांना मिळाल्याने मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मेघालय येथील मा. वरिष्ठ पोलीस अधिका-यांशो संपर्क साधुन त्याना आरोपींची माहित पुरवून सदर आरोपी मिळुन आल्यास त्यांना आपल्या ताब्यात घेण्याची विनंती करण्यात आली होती.
महाराष्ट्र पोलीसांनी सदर गुन्हयातील फरार झालेल्या आरोपींची पूर्ण माहित मेघालय पोलिसांना दिली त्यावरून मेघालय पोलिसांनी आरोपीची माहिती काढून सदर गुन्हयातील ०६ हो नायजेरियन आरोपींना दिनांक ६/५/२०२२ रोजी ताब्यात घेण्याची महत्वपुर्ण कामगिरी केली . अशा प्रकारे वालीव पोलीस ठाण्याचेहद्दीतील एका नायजेरीयन इसमाचा खुन करुन अटक टाळण्यासाठी बांगलादेश बॉर्डर मार्गे पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या ०६ नायजेरीयन आरोपींना महाराष्ट्र पोलीस व मेघालय पोलीस यांनो संयुक्तीकरित्या केलेल्या कारवाईमुळे २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात आलेले असून पुढील कारवाई साठी आरोपीना वालीव पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पोलोसांकडुन पुरविलेल्या माहोतीची आधारे सदरची मोलाची कामगिरी मेघालय येथोल श्री . शैलेंद्र बमानिया (भाषोसे),पोलीस अधीक्षक वाहतुक शाखा,पुर्व खासी होल्स शिलौग श्री . टो मो चाको, अपर पोलीस अधीक्षक,आयजीपो ऑफिस मेघालय,श्री इवान बेनसन डिंगडोह , डो एस पो सोटो इस्ट काशो हिल्स शिलाग श्री गिल्वट मार्शिलांग, डी बाय एस पौ ट्रफिकरिभोई एस.एच.ओ.सदर पोलोस ठाणे श्रो सो एन रानो एम एफ सी / बिपुल बोरो अबीसी / शालांड मलाई अवो-डोसो/स्कायबोलांन पेरोऑग हया अधिकारी/अंमलदारांनी केलेली असुन सदरची कारवाई मा. श्री सदानंद दाते, पोलोस आयुक्त मि.भा.व.वि., मा. श्रो श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त, श्री संजयकुमार पाटील, पोलोस उप आयुक्त, परिमंडळ-२ वसई, सो पंकज सिरसाठ, सहा पो आयुक्त तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री केलास बर्वे, वरिष्ठ पोलोस निरोक्षक, राहुलकुमार पाटील, पोनिरो (गुन्हे), सपोनि संतोष सांगवीकर तसेच गुन्हे प्रकटोकरण पथकातोल सपोनि ज्ञानेश फडतरे, पोहवा/३ मनोज मोरे , पोहवा/ मुकेश पवार, पोहवा/किरण म्हात्रे, पोना/ सचिन दोरकर, पोना/ राजेंद्र फड, पोना/ गांगुर्डे, पोअं/ गरोबे, पोअं/ मुंडे, पोअं/खताळ व वालोव पोलोस ठाण्यातील इतर अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
