भाईंदर : बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीस दोन इसमांनी फसवुन त्यांचे पैसे चोरले . मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २४.११.२०२१ रोजी रामभवन कल्पनाथ राजभर, वय २५ वर्षे हे युनीयन बँकेत पैसे भरण्यासाठी गेले असतांना दोन अनोळखी इसमांनी त्यांना पैश्यांचे आमीष दाखवुन त्यांचे रुमालामध्ये १ लाख रु. बांधलेले आहेत असे सांगुन पैश्यांचे आकाराचे कागद बांधलेला रुमाल रामभवन राजभर यांना देऊन त्यांच्याकडुन २०,०००/- रु. घेवुन फसवुणक केली होती. सदरबाबत नवघर पोलीस ठाणे येथे आरोपीनं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर बाबत नवघर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे ठिकाणावरील व इतर ठिकाणावरील मिळालेल्या पुराव्याच्या आधारे सदरचा गुन्हा हा ३ अनोळखी आरोपी यांनीं केला असल्याचे समजले पोलिसांनी गुन्हयातील साक्षिदार, घटनास्थळावरील पुराव्यांचे आधारे व बातमीदारांमार्फत मिळालेल्या बातमीवरून तपास करुन आरोपी १) राजा रमेश राजभर, वय २१ वर्षे व २) विशाल रमेश राजभर यांना पेनकारपाडा येथुन ताब्यात घेवुन त्यांच्याकडे कसुन व कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांनी फसवणुक केलेली मालमत्तेपैकी १३,०००/- रु. रोख रक्कम व गुन्हयात वापरलेली स्कुटी मोटार साकयल हस्तगत केलेली आहे. तसेच सदर अटक आरोपीकडे अधिक तपास करता नवघर पोलीस ठाणे येथे यांच्यावर अगोदर हि अशा प्रकारचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. शशीकांत भोसले, सहा. पो. आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/प्रकाश मासाळ (गुन्हे), सपोनि/योगेश काळे, पोउनि/संदिप ओहोळ, पोना/भुषण पाटील, पोशि/गणेश जावळे, संदिप जाधव, सुरज घुनावत यांनी केलेली आहे.
