भाईंदर : श्री. महेश बुधाजी पाटील, वय ४५ वर्षे, व्यवसाय-ट्रान्सपोर्ट, रा. विरार यांचे मालकीचा ०३,५०,०००/- रु. किं. चा टाटा कंपनीचा एलपी ट्रक क्र. एमएच-०४-सीए-८३९१ त्यामध्ये असलेला १०,००,०००/- रु. किं.चे स्टिल, ग्लास व वाटी असा एकुण १३,५०,०००/- रु. ची मालमत्ता असलेला ट्रक दिनांक २१/०८/२०२१ रोजी भाजी मार्केट, भाईंदर पुर्व येथुन चोरी झाल्याची तक्रार केली असुन नवघर पोलीस ठाणे येथे अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.
मिरा-भाईंदर परिसरात वाहन चोरीचे गुन्हयांचे वाढते प्रमाण पाहता वरिष्ठांनी सदर गुन्हयाची लवकरात लवकर उकल करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा करणारा आरोपीस रेतीबंदर, बांबुवाडी, माहिम मुंबई येथुन अटक केलेली आहे. तसेच आरोपीने चोरी केलेला ट्रक व त्यामधील मालापैकी ७० गोणीमधील स्टिल ग्लास व वाटी असे माल हस्तगत केला. तसेच आरोपीने उर्वरीत १४ गोणीमधील स्टिल ग्लास व वाटी असा चोरीचा माल विकत घेणारा आरोपी भंगार दुकानदार यास माहिम, मुंबई येथुन अटक करुन त्याचेकडुन १४ गोणीमधील स्टिलचे ग्लास व वाटी असा गुन्हयातील चोरी झालेला १३,५०,०००/- रु. संपुर्ण माल हस्तगत केलेला आहे.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. शशीकांत भोसले, सहा. पो. आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, सपोनि. योगेश काळे, पोउनि. संदिप ओहोळ, पोना. रविंद्र भालेराव, पोना. ऐनोदीन शेख, पोशि. संदिप जाधव, पोशि. युनुस गिरगांवकर, पोशि.अमित पाटील यांनी केली आहे.
